बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हा कोणता माज?”, मराठी भाषा न बोलणाऱ्यांविरोधात अक्षय केळकरचा संताप, पोस्ट शेअर करत म्हणाला, “किमान कर्मभूमीबद्दल…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 5, 2025 | 11:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Kelkar Post

"हा कोणता माज?", मराठी भाषा न बोलणाऱ्यांविरोधात अक्षय केळकरचा संताप, पोस्ट शेअर करत म्हणाला, "किमान कर्मभूमीबद्दल…"

Akshay Kelkar Post : सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची असण्यावरुन बराच वाद सुरु असलेला पाहायला मिळतो. मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रात बोलली गेली पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. कामाच्या ठिकाणी, वा बाहेरच्या राज्यातून आलेल्यांनी मराठी भाषा बोलली आहे असं नाही आहे. पण त्यांनी तसा माजही दाखवू नये असं अनेकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेच्या समर्थनार्थ आता मराठी कलाकारही सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसले. आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरही मराठी भाषेबाबत बोलताना दिसला. थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने मराठी भाषा बोलण्यावरुन आपलं मत मांडलं आहे.

अक्षयने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत, “माझ्या आजुबाजूला आणि माझ्या व्यवसायात असे माझे अनेक मित्र -मैत्रिणी आणि परिचित लोक आहेत, जे जन्माने अमराठी आहेत. केवळ चार ते पाच वर्षांपासून ते महाराष्ट्रात आणि मुंबईत वास्तव्य करत आहेत परंतु ते खूप छान मराठी बोलतात. त्याचबरोबर अशीही काही माणसे आहेत, ज्यांना बरीच वर्ष इथे राहूनही संपूर्ण शुद्ध मराठी शिकायला जमत नाही, तरीही तोडकी मोडकी का असेना, पण मराठीत बोलायचा प्रयत्न करतात. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आदर असतो, तेव्हा तो आपल्या कृतीतून, प्रयत्नांतून स्पष्ट दिसत असतो”.

आणखी वाचा – “राशीयोग बरा नव्हता”, “तुला शिकवीन…” मालिकेच्या अभिनेत्याची साबळेंच्या समर्थनार्थ पोस्ट, उपाध्येंची कानउघडणी करत म्हटलं, “वयोवृद्धाकडून…”

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

पुढे त्याने म्हटलं, “तुम्ही ज्या राज्यात वास्तव्याला आहात, त्या राज्याची भाषा तुम्हाला बोलता येणं ही अपेक्षा खरंच इतकी मोठी आहे? तुम्हाला शुद्ध मराठीची कोणतीही परीक्षा द्यायची नाही, तर फक्त गरजेपुरते मराठी बोलता येईल इतकीच अपेक्षा आहे. प्रत्येक राज्य जर तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या आधारेच ठरविण्यात आलं आहे, तर त्या-त्या राज्यात ती-ती भाषा बोलली जावी ही अपेक्षा चूक कशी काय असू शकते?. तरीही, कोणत्याही कारणामुळे, जर इथली भाषा बोलता येत नसेल, तर किमान सौजन्यपूर्वक ही बाब मान्य करुन, मुजोरी न दाखवता ही संवाद साधता येऊ शकतो”.

आणखी वाचा – “कार्तिक आर्यनाचाही सुशांत सिंह राजपूत होणार”, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाचा धक्कादायक दावा, काळं सत्य समोर

अखेरीस अक्षयने, “इथे प्रत्येकजण आपापल्या परीने कमवत आहे, कमवायलाच आलेला आहे. प्रत्येकजण कष्ट करुन आपापल्या पद्धतीने जगतो आहे. तेव्हा, स्वतःच्याच जगण्यासाठी मिळवलेल्या उत्पन्नाचा आणि जमवलेल्या संपत्तीचा हा कोणता माज?. जरी तुमचा जन्म इथे झाला नसला तरी, आपल्या कर्मभूमी बद्दल किमान आदर तरी असावा”, असं त्याने म्हटलं आहे. अक्षयची ही पोस्ट अनेकांच्या पसंतीस पडली आहे.

Tags: akshay kelkar postmarathi actormarathi langauge
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Thackeray brothers reunion

"जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं", राज ठाकरेंच्या वक्तव्याची चर्चा, थेट सरकारला सवाल, म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.