सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाबरोबरच फिटनेसमुळे अधिक चर्चेत असतात. यांत एका कलाकार जोडीचं नाव आवर्जून घेता येईल ते म्हणजे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. या नारकर कपलचे लाखो दिवाने चाहते आहेत. वयाची पन्नाशी ओलांडली तरी या जोडीची ऊर्जा तरुणाईला लाजवेल अशी आहे. अशा या फिटनेस फ्रिक असलेल्या जोडीचे लाखो दिवाने चाहते आहेत. अविनाश नारकर बरेचदा त्यांच्या व्यायामाचे, योगाचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर करत असतात. (Avinash Narkar Video)
सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच चर्चेत असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चर्चेत असतात. ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या पसंतीस पडतात. बरेचदा ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवल्यामुळे या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र ट्रोलिंगला न जुमानता ही जोडी सोशल मीडियावर सक्रिय असते. अशातच अविनाश यांनी योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अविनाश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, शिव म्हणजे काही नाही. मनाच्या अशा शून्यावस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी योग महत्त्वाचा. योग म्हणजे जुळणे, जुळून येणे आणि जुळवून आणणे. मेळ साधणे, श्वास – उच्छवासाचा अचूक व योग्य मेळ साधून मनाला नक्कीच शून्यावस्थेपर्यंत आणता येते. आपला प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण योगस्थित करुन त्याचा अचूक आणि योग्य मेळ साधता आला तर आपलं जगणं आपलं आयुष्य सफल संपन्न, आनंदमय व अहंविरहित झाल्याशिवाय रहाणार नाही”, असं त्यानी म्हटलं आहे.
एकूणच योगाचं प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे. आणि आपल्या स्वतःसाठी योगा करणे किती आवश्यक आहे याची महती त्यांनी पटवून दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्यांच कौतुक केलं आहे तर काहींनी त्यांना हा व्हिडीओ पाहून ट्रोल ही केलं आहे. सध्या अविनाश नारकर ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत पहायला मिळत आहेत.