मराठी मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना २०२२ साली कर्करोग असल्याचे निदान झालं होतं. त्यांनी उपचारदेखील सुरु केले. त्यानंतर या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. आज (१४ ऑक्टोबर) अतुल यांच्या निधनाची माहिती समजताच कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे. (atul parchure passed away)
अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरेदेखील झाले होते. गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेलं पाहायला मिळालं होतं. झी नाट्य गौरव सोहळ्यादरम्यान अतुल यांची खास उपस्थिती असलेली पाहायला मिळाली. आजवर अतुल यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र मधल्या काही काळात अतुल यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. आजारपणाशी लढा देत अतुल यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु केला होता.
मराठी सिनेसृष्टीमध्ये कार्यरत असताना अचानकपणे त्यांना कर्करोग झाल्याचे समोर आले होते. उपचार घेताना त्यानं खूप यातनांना समोरे जावे लागले होते. मात्र त्यांनी या गंभीर आजारावर मात करत अतुल पुन्हा एकदा जिद्दीने उभे राहिले. त्यांच्या या काळामध्ये अतुल यांची पती सोनियाने त्यांना खूप साथ दिली होती. एका मुलाखतीदरम्यान याबद्दल त्यांनी सांगितले होते. मात्र या सगळ्यामध्ये जिद्दीने उभे असतानादेखील त्यांची कर्करोगाशी असलेली झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आणखी वाचा- Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते शोमधून बाहेर?, असं नक्की काय घडलं? घरात मोठी भांडणं
अतुल यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आजवर अनेक नाटकं, मालिका व चित्रपटांममध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या भूमिकेला सगळ्यांचीच खूप पसंती मिळाली होती. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीदेखील चांगलीच गाजवली. ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. यामध्ये त्यांच्याबरोबर सुबोध भावे, आनंद इंगळे, उमेश कामत, श्रुती मराठे, मुक्ता बर्वे असे अनेक दिग्गज कलाकार होते. तसेच कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे,तुझं आहे तुजपाशी अशा नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.