सध्या सर्वत्र ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाची चर्चा सुरु आहे. नवीन पर्वामध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश झालेला दिसून येत आहे. ६ ऑक्टोबर रोजी या पर्वाचा ग्रँड प्रीमियर झाला. अत्यंत दिमाखदार सोहळा पार पडला.यामध्ये आता पहिला नॉमिनेशन टास्कदेखील पार पडला. यामध्ये चाहत पांडे, मुस्कान बामणे, गुणरत्न सदावर्ते, करणवीर मेहरा व अविनाश मेहरा हे सदस्य नॉमिनेट झाले होते. मात्र कोणीही घराबाहेर गेले नाही. केवळ गधराजच या घराबाहेर पडला. अशातच आता निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये विवियन डिसेना व अविनाश मिश्रा दिसून येत आहेत. दोघंही घरातील ड्यूटी समजावून सांगताना दिसत आहेत. (bigg boss 18 update)
‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यावेळी विवियन अविनाशला विचारतो की, “सध्या तु काय करत आहेस?”, त्यावर अविनाश म्हणतो की. “सध्या काही नाही”. त्यावर विवियन का? असे विचारतो. त्यावर अविनाश म्हणतो की, “मी सगळं रात्री करेन”. दरम्यान विवियन अविनाशला म्हणतो की, “सध्या डायनिंग टेबल साफ कर”, त्यावरुन विवियन व अविनाश यांच्यामध्ये वाद सुरु होतात. त्यावर विवियन व अविनाश यांच्यामध्ये वाद सुरु होतात. विवियन अविनाशला म्हणतो की, “जेव्हा तुला एखादे काम दिले जाते तेव्हा कोणीही प्रश्न विचारू नये”.
आणखी वाचा – आजी झाल्यानंतर नीना गुप्तांचा आनंद गगनात मावेना, नातीसह शेअर केला फोटो
तसेच त्यानंतर अविनाशने विवियनला सांगितले की, “सगळे जण आपापले काम करतील”.त्यावर विवियन म्हणतो की, “कोणीही वाट बघणार नाही. कोणी काय करावे हे ‘बिग बॉस’ सांगणार नाहीत. सगळे जणा स्वतःच काम स्वतः करा”. दरम्यान आता सतत चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दलची नवीन अपडेट समोर आली आहे.
गुणरत्न यांना काही दिवसांसाठी घराबाहेर पाठवले आजे. त्यांची एका केस संदर्भात सुनावणी असल्याकारणाने ते घराबाहेर आहेत. केस पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा घरात येतील. अशी माहिती समोर आली आहे.