आपल्या दमदार अभिनयामुळे व बेधडक वक्तव्यामुळे कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्ताद अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय घडामोडींबाबतही भाष्य करत असतो. बरेचदा आस्तादने भाष्य केलेल्या या पोस्टमुळे त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. मात्र या ट्रोलर्सला न जुमानता कायमच अभिनेता आपलं स्पष्ट मत मांडण्यात कधीच कचरला नाही. आस्तादने त्याच्या कलेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वर्चस्व निर्माण केलं. (Astad Kale Poem)
‘अग्निहोत्र’ सारख्या मालिकेतून आस्तादनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनेता घराघरात पोहोचला. आस्तादनं त्याच्या कामातून त्याची वेगळी ओळख निर्माण करत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयासह आस्तादने त्याची लिखाणाची आवडही जोपसली. आस्ताद हा उत्तम लेखक असून त्याला कविता लिहायलाही आवडतात. बरेचदा तो त्याच्या कविता फेसबुकवरून चाहत्यांसह शेअर करत असतो.
अशातच आस्तादने नुकतीच रोहिणी निनावे यांच्या सातवा ऋतू या पुस्तक प्रकाशन सोहळयाला हजेरी लावली होती. यावेळी आस्ताद काळेही उपस्थित होता. दरम्यान, या सोहळ्याला अभिनेत्याने या पुस्तकातील एका कवितेचं वाचन केलं. आत्महत्या करणं योग्य आहे काय? असे या कवितेचं नाव होतं. ही कविता वाचताना आस्ताद भावुक झालेला पाहायला मिळाला. जगण्याची उमेद देणारी ही कविता मनाला स्पर्शून गेली. अतिशय आशयघन असा विषय असलेल्या या कवितेचं साऱ्यांनी कौतुक केलं.
आस्ताद त्याच्या कामामुळे जितका चर्चेत राहिला त्याहून जास्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. आस्तादनं २०२१मध्ये अभिनेत्री स्वप्नाली पाटीलबरोबर लग्न केलं. ‘बिग बॉस’मध्ये असताना त्यानं त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. स्वप्नालीबरोबर लग्न करण्याआधी आस्तादची एक गर्लफ्रेंड होती.मात्र तिचा फार कमी वयात मृत्यू झाला. तिच्या जाण्याच्या आस्तादला फार मोठा धक्का बसला होता. आस्तादने ‘बिग बॉस’च्या घरात त्याच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनेबद्दल सांगितलं होतं.