शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नाला १२ वर्षे झाली आहेत तरी…”, हेमंतचं क्षिती जोगबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य, म्हणाला, “एकमेकांकडून अपेक्षा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2025 | 4:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor and director Hemant Dhome commented on his friendship with his wife Kshitee Jog

अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेचं पत्नी क्षिती जोगबरोबरच्या मैत्रीच्या नात्याबद्दल भाष्य

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांना ओळखले जाते. हेमंत व क्षिती यांनी २०१२ मध्ये एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. मनोरंजनसृष्टीत काम करता करता ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाला जवळपास १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच हेमंतने त्याच्या लग्नाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला कधीही बायको नको असल्याचे म्हटलं. तसंच त्यांच्या नात्यात चांगली मैत्री असल्याचेही त्याने सांगितले. (Hemant Dhome on her friendship with wife Kshiitee Jog)

याबद्दल हेमंतने असं म्हटलं की, “मला कधीच बायको नको होती. मला मैत्रीण हवी होती. म्हणजे माझ्या माथी जर बायको आली असती तर मला माझं आयुष्य कंटाळवाण झालं असतं. त्या बायको म्हणून अपेक्षा, मग आपण नवऱ्यासारखं वागा. मैत्रीण हेच पहिल्यापासून अपेक्षित होतं आणि आता लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. तर आमची मैत्री अजून घट्ट झाली आहे. अजून एकमेकांकडून अपेक्षा नसलेली मैत्री झाली आहे आणि ही मैत्री अजूनच हळूहळू वाढत आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की आमचा लग्नानंतरचा रोमान्स अधिक वाढला आहे. लग्नाआधी आमच्यात रोमान्स नव्हताच की काय असं वाटतं”.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

आणखी वाचा – अक्षरा आई होणार असल्याचं सत्य भुवनेश्वरीला समजणार, अधिपतीशी बोलण्यासाठी धडपड, एकत्र कधी येणार?

यापुढे हेमंतने असं म्हटलं की, “आता हो रोमान्स दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे आमच्या मैत्रीत काहीही लपवाछपवी नाही. आम्ही सर्व गोष्टी एकमेकांना सांगतो. हे लोकांना खोटं वाटेल. आम्हाला तिसरा व्यक्ती येऊन असं नाही शकत की, तुला माहीत आहे हेमंतने असं असं केलं किंवा असं असं बोलला. हे तिला कुणीही येऊन सांगणार नाही आणि माझ्याकडेही कुणी येऊन सांगणार नाही. कारण आम्हीच हे एकमेकांना सांगून झालेलो असतो. आम्हीच एकमेकांशी प्रत्येक गोष्टीबद्दल खूप बोलतो. त्यामुळे ही मैत्री महत्त्वाची आहे असं मला वाटतं”.

आणखी वाचा – गश्मीर महाजनीची ‘गुनाह’ सीरिज आणि छाया कदम यांचा ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ प्रेक्षकांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार?

दरम्यान, क्षिती हेमंतपेक्षा ३ वर्षाने मोठी आहे. व्यावसायिक आयुष्यात तिची सुरुवात हेमंतच्या आधी झाली. १० डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी पुण्यामध्ये लग्न केले आणि खर्‍या अर्थाने संसाराला सुरुवात झाली. कलाक्षेत्र, आपापली कामं आणि घर या सगळ्याचा तोळ संभाळत हे दोघे त्यांचा संसार करत आहेत. लवकरच त्यांचा फसक्लास दाभाडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: hemant dhomehemant dhome and his wifeHemant Dhome on her friendship with wife Kshiitee Jog
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
abhijeet bhattacharya on a r rahaman

"खूप वाट बघितली पण…", ए.आर. रेहमानने प्रसिद्ध गायकाला रात्रभर ठेवलं ताटकळत, म्हणाला, "कलाकृतीच्या नावाखाली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.