२०२५ हे वर्ष सुरू झाले असून या नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर मनोरंजनाचा डोस अनुभवता येणार आहे. वास्तविक, दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही अनेक रोमांचक वेबसीरिज आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. वर्षाच्या पहिल्या आठवड्यात घरी बसून ओटीटीवर कोणते चित्रपट आणि मालिका तुम्हाला पाहता येणार? याबद्दल जाणून घेऊया… (Gunah and All We Imagine as Light released on OTT)
गुनाह : अभिनेत्री सुरभी ज्योती, झेन इबाद खान आणि गश्मीर महाजनी स्टारर ‘गुनाह’ ही एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे, जी सस्पेन्सने परिपूर्ण आहे. या सीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यांतर आजपासून या सीरिजचा दूसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अभिनेता गश्मीर महाजनी पहिल्यांदाच अँटी हिरो बनून ओटीटीच्या जगात खळबळ माजवली आहे. या सीरिजमध्ये गश्मीर अभिमन्यूची भूमिका साकारत आहे. तर झैन इबाददेखील अभिमन्यूची भूमिका करत आहे. ही सीरिज आजपासून म्हणजेच ३ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
आणखी वाचा – Video : लग्न मंडपात एन्ट्री करताना मराठी अभिनेत्रीला रडू आवरेना, नवऱ्याला बघितलं अन्…; भावुक व्हिडीओ व्हायरल
ऑल वी इमॅजिन ॲज लाइट : ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा २०२४ मध्ये जगभरात चर्चेत राहिलेला भारतीय चित्रपट आहे. बराक ओबामा यांच्यासह अनेक दिग्गजांकडून व समीक्षकांकडून कौतुक झालेला आणि अनेक अवॉर्ड्स मिळवणारा हा चित्रपट अखेर प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात मोजक्याच शहरांमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ३ जानेवारीपासून डिस्ने+हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कनी कुसरुती, दिव्या प्रभा, छाया कदम, हृधू हारून आणि अजीस नेदुमनगड हे कलाकार आहेत.
व्हेन द स्टार्स गॉसिप : ‘व्हेन द स्टार्स गॉसिप’ हे कोरियन ड्रामा आहे. हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर आधारित आहे. ली मिन-हो आणि गोंग ह्यो-जिन यांनी या शोमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हे कोरियन नाटक रोमान्स, कॉमेडी आणि साहस यांचे मिश्रण आहे. ‘व्हेन द स्टार्स गॉसिप’ ०४ जानेवारी २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.