‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका जवळपास गेली दोन वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरी या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेत कायमच नवनवीन ट्विस्ट येत असतात. मालिकेत सध्या अक्षरा गरोदर असल्याचा नवीन ट्विस्ट आला आहे. अक्षराने नुकतंच सूर्यवंशींचं घर सोडलं आहे. अक्षराला घराबाहेर काढल्यावर भुवनेश्वरी आणि तिची बहीण दुर्गेश्वरी या दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र अक्षरा आई होणार असल्याच्या या नवीन ट्विस्टने मालिकेला एक नवं वळण आलं आहे. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)
मालिकेत एकीकडे अक्षरा आई होणार आहे, तर दुसरीकडे त्यांचा अबोलाही पाहायला मिळत आहे. अक्षरा अधिपतीच्या संवाद साधण्याचा आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण अधिपतीपर्यंत तिचा संवाद होत नाही. अशातच कालच्या भागात अक्षराने अधिपतीच्या मोबाइलवर फोन केला. मात्र हा फोन भुवनेश्वरीने उचलला. या फोनवर अक्षरा तिच्याकडे गुडन्यूज असल्याचे सांगते. मात्र ही गुडन्यूज भूनवेश्वरीला नीट ऐकू जात नाही. पण तिच्या मनात याविषयीचा संशय वाढतो. याच संशयाचं निरसन करायला ती डॉक्टरकडे जाते. तेव्हा डॉक्टरकडून भुवनेश्वरीच्या आई होण्याबद्दल तिला समजते.
आणखी वाचा – Video : लग्न मंडपात एन्ट्री करताना मराठी अभिनेत्रीला रडू आवरेना, नवऱ्याला बघितलं अन्…; भावुक व्हिडीओ व्हायरल
याच ट्विस्टचा एक प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात अक्षरा चुकून भूवनेश्वरीला अधिपती समजून मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे असं म्हणते. तर दुसरीकडे अधिपतीचा मित्र त्याला अक्षराला भेटून सगळा गैरसमज दूर करण्याविषयी सांगतो. त्यानंतर भुवनेश्वरी डॉक्टरांना म्हणते की, “आमच्या सुनबाईंना चक्कर आली होती. त्यांना नेमकं काय झालं होतं?”. यावर डॉक्टर तिच्याकडे गुडन्यूज असल्याचे सांगतात. अक्षरा आई होणार आहे असं ती डॉक्टर भुवनेश्वरीला सांगतात. यानंतर भुवनेश्वरीकया चेहऱ्यावरचा रंगच उडतो.
त्यामुळे आता अक्षरा-अधिपतीमधील हा गैरसमज कधी दूर होणार? अक्षराकडे गुडन्यूज असल्याचे समजताच आता यावर भुवनेश्वरीची काय प्रतिक्रिया असणार? भुवनेश्वरी पुन्हा एकदा दोघांच्या नात्यात काही विघ्न आणणार का? हे लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसंच अक्षरा आई होणार असल्याच्या गुडन्यूजमुळे तिचे अधिपतीबरोबरचे नातेही नीट होणार का? याबद्दलही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.