शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अनेकांना त्रास होतो पण…”, मराठी न बोलण्यावरुन सुनावणाऱ्यांवर अजिंक्य देव भडकले, म्हणाले, “हे लोक मराठी चित्रपट…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 26, 2023 | 5:16 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor ajinkya deo shared video on instagram with challenge to audience

"अनेकांना त्रास होतो पण…", मराठी न बोलण्यावरुन सुनावणाऱ्यांवर अजिंक्य देव भडकले, म्हणाले, "हे लोक मराठी चित्रपट…"

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. त्यांच्या अभिनयासह त्यांचं देखणं व्यक्तिमत्त्व सगळ्यांनाच भावतं. आपल्या अभिनयाने व देखणेपणाने चर्चेत राहणारे अजिंक्य सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपले अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहतेही भरभरून प्रतिसाद देतात. अशातच त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. अजिंक्य यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

मराठी कलाकारांनी एखादवेळेस इंग्रजी किंवा हिंदी भाषेचा वापर केल्यास नेटकऱ्यांकडून त्यांना अनेक प्रतिक्रिया येत असतात. यावर काही कलाकार दुर्लक्ष करतात, तर काही कलाकार यावर आपली मतं मांडतात. अशातच अजिंक्य देव यांनीही एक व्हिडीओ शेअर करत त्यांचे मत मांडले आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, “मी अनेकदा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये रील व्हिडीओ बनवतो याचा अनेकांना त्रास होतो. त्यांना वाटतं मी माझी मायबोली विसरुन या गोष्टी करतो. मला या सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे, ही सगळी मंडळी मराठी चित्रपट बघायला पहिल्याच दिवशी जातात का? हे लोक मराठी चित्रपट पाहायला जात असतील तर या मंडळींनी नक्की मला तसं सांगावं म्हणजे मी त्यांना सलाम ठोकेन.”   

View this post on Instagram

A post shared by Ajinkya R Deo (@ajinkkyadeo)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “पुरुषाचे लक्ष वेधून घेण्यासाठी…”, मन्नारा व आयेशा खानला उद्देशून मुन्नवर फारुकीच्या गर्लफ्रेंडचं ट्वीट, म्हणाली, “इतर स्त्रियांना…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “मराठी चित्रपटसृष्टी ज्यापद्धतीने चालायला हवी तशी सध्या नाही चालत आहे. काही चित्रपट चालत आहेत. पण तेही फार ठीक नाही. हिंदीमध्ये असं होताना दिसत नाही. त्यांचे बहुतांश चित्रपट चालतात. ही सगळी विरोध करणारी मंडळी मोठ्या स्टार्सचे हिंदी चित्रपट पाचशे ते हजार रुपयांचं तिकीट काढून पाहायला जातात. म्हणूनच सध्याचे हिंदी चित्रपट एवढी कमाई करत आहेत. मी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो हे मान्य करतो. यापुढे मी माझ्या मायबोलीत संवाद साधण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण तुम्ही सगळ्यांनी या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन आम्ही मराठी चित्रपटच पाहणार आणि आपल्या चित्रपटांना हिंदीच्या तोडीस तोड पहिल्या दिवशी जाऊन गर्दी करणार हे सांगा. मग मी नक्कीच या अशा लोकांना सलाम करेन.”

आणखी वाचा – “हिंसा आणि लैंगिकता…”, वैभव मांगलेंची रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटावर टीका, म्हणाले, “खूप घातक…”

दरम्यान अजिंक्य देव यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने असे म्हटले आहे की, “लोकांना काय करायचं आहे आपण आपलं करत रहायचे दादा, या अशा लोकाकांडे दुर्लक्ष करा सर, बरोबर बोलत आहात तुम्ही, मी तुमच्या मताशी १००% सहमत आहे” अशा कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी याविरूद्ध कमेंट्सदेखील केल्या आहेत. त्यांमुळे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असताना दिसत आहेत.

Tags: ajinkya deoentertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bipasha Basu Baby First Look

आलिया भट्टनंतर बिपाशा बासूनेही दाखवला लेकीचा चेहरा, नेटकरी म्हणाले, "हुबेहूब वडिलांसारखीच …"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.