बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी यंदाचा ख्रिसमस खूप खास आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ख्रिसमसच्या मुहूर्तावर अनेक कलाकारांनी आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिलेलं पाहायला मिळत आहे. यांचं उत्तम उदाहरण द्यायचं झाल्यास रणबीर कपूर व आलिया भट्ट यांचं देता येईल. रणबीर व आलिया यांनी त्यांच्या चाहत्यांना लेक राहाचा चेहरा दाखवला आहे. रणबीर व आलियाने राहाला पापाराझींसमोर आणत साऱ्यांना धक्का बसला. राहाच्या क्यूटनेसच्या धक्क्यातून चाहते बाहेर येण्याआधीच बिपाशा बासूनेही चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. (Bipasha Basu Baby First Look)
ख्रिसमसच्या निमित्ताने बिपाशाने पहिल्यांदाच तिची लेक देवीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. देवीचा फोटो पाहून चाहत्यांना तिच्या क्यूटनेसची भुरळ पडली आहे. बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर गेल्या वर्षी आई-वडील झाले. देवीच्या जन्मापासून बिपाशाचे कुटुंब चर्चेत आले आहे. यंदा त्यांनी त्यांच्या लेकीचा पहिला वाढदिवस दिवाळीला साजरा केला. त्यावेळी चाहत्यांना वाटले होते की बिपाशा व करण आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवतील. चाहत्यांची ही इच्छा त्यांनी ख्रिसमसच्या दिवशी पूर्ण केली आहे.
बिपाशा बासूने देवीचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा एका बाजूने चेहरा दिसत आहे. लाल रंगाचा ड्रेस व हेअरबँडमध्ये देवी खूपच क्यूट दिसत आहे. देवीचा चेहरा पाहून चाहते तिचं भरभरून कौतुक करत आहेत. बिपाशाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लेकीचं कौतुक केलं आहे. काही चाहते देवीला करणची कॉपी असं म्हणत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “पापाची कॉपी”. तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “बार्बी डॉल” असं म्हटलं आहे.
बिपाशा बासूने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी देवीला जन्म दिला. अलीकडेच बिपाशाने लेक झाल्यानंतर वाढलेल्या वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. इंडिया टुडेशी बोलताना बिपाशा म्हणाली होती, “मला त्यांना सांगायचे आहे की, कृपया ट्रोल करत रहा. हे अगदी अचूक आहे, मला काही फरक पडत नाही” असं तिने मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं.