सध्या सर्वत्र मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसाने कोकणाला स्वर्ग बनवून टाकलं आहे. अनेकजण या स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी कोकण दर्शन घेताना दिसत आहेत. यांत कलाकार मंडळीही मागे राहिलेले नाहीत. अनेक कलाकार कोकणात जात तिथे एन्जॉय करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर कोकणात सध्या शेतीला सुरुवात झाली असून ते या शेतीचा अनुभवही घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘मन उडू उडू झालं’ फेम ऋतुराज फडके याने कोकणात जात शेती केली. यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने हा अनुभव शेअर केला आहे. (Abhijeet Kelkar Video)
हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. ‘बिग बॉस’ मराठीमुळे अभिजीतला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय अभिजीतने अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावरही अभिजीत बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अभिजीत बरेचदा फिरतानाचे सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत तो अपडेट देत असतो.
अशातच सध्या अभिजीत कोकणात एन्जॉय करताना दिसत आहेत. कोकणात भातशेती करण्याचा अभिनेता आनंद लुटत आहे. पावसात अखंड भिजत शेती करत आणि शेतातच जेवण जेवतानाचा अनुभव तो घेत आहे. हा अनुभव शेअर करत त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो असं बोलताना दिसत आहे की, “मी कोकणातील आहे. आणि या गोष्टीचा मला कायमच अभिमान आहे. तसं असूनही इतक्या वर्षात पावसाळ्यात कधी कोकणात यायची संधी मिळाली नाही. कुठल्या ना कुठल्या कारणाने व्यस्त असायचो त्यामुळे तशी वेळ आली नाही. पण या वेळेला मी आणि माझ्या मित्राने ठरवून अलिबागमधील एका छोट्याश्या गावात आम्ही आलो आहोत”.
पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “पावसाचा मनमुराद आनंद लुटत आहोत. त्याचप्रमाणे लावणीचा प्रत्यक्ष शेतात येत आनंद लुटला आहे. या सगळ्या लोकांचं प्रेम अनुभवलं. गवत हातात घेतल्यावर त्याचा अनुभव कसा असतो वा इतका पाऊस पडल्यानंतरही पावसात माती पायांना कोमठ कशी लागते याचा स्वर्गीय आनंद इथे येऊन उपभोगला”. अभिजीतच्या या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.