‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा असतो. तर, अक्षरा ही एका शाळेत शिक्षिका असते.
अक्षरा व अधिपती आता लवकरच हनिमूनला जाणार असल्याचा सीक्वेन्स मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मालिकेची टीम शूटिंगसाठी परदेशात रवाना झाली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेची संपूर्ण टीम थायलंड, फुकेत येथे गेली आहे. अक्षरा व अधिपती यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला रवाना झाली आहे. याची खास झलक शर्मिष्ठाने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. तर, शिवानी रांगोळेनेदेखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अशातच अक्षरा-अधिपती यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे थायलंडमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अधिपती-अक्षरा थायलंडमधील समुद्रकिनारी धावताना पाहायला मिळत आहे. ‘कहो ना प्यार है’ या लोकप्रिय गाण्यावर या दोघांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अधिपती-अक्षराचा खास लुकदेखील पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Video : गावी भातलावणी, भजन अन् खेकडे पकडण्यात रमला निखिल बने, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक, साधेपणाचं कौतुक
या व्हिडीओमध्ये साडीतल्या मास्तरीण बाई पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहेत. तर अधिपतीनेही पांढऱ्या रंगाचा शर्ट व पॅंट परिधान केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ प्रेक्षकांना चांगलाच आवडला असून अनेकांनी याबद्दल कमेंट्सद्वारे प्रतिक्रियादेखी दिल्या आहेत. तसेच त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हृतिक व अमीषा यांची आठवण झाली असल्याचेही म्हटलं आहे.