योगा ही व्यायामासोबतच एक प्राचीन कला आहे. योगा मन आणि शरीराला जोडणारा व्यायाम आहे. कलाकार स्वतःच स्वस्थ नीट ठेवण्यासाठी योगा करताना दिसतात. अशातच प्रसिद्ध आणि जेष्ठ अभिनेता अविनाश नारकर यांनी योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Avinash Narkar Yoga )

या व्हिडीओमध्ये अविनाश पोटाचे योगासन करताना दिसत आहेत. या व्हिडीओला अविनाश यांनी “yoga is not workout.. It’s work in” असे कॅप्शन दिले आहे. अविनाश यांच्या व्हिडीओवर अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने ‘अमेझिंग’ अशी कमेंट केली आहे तर अभिनेत्री मधुरा जोशी हिने ‘कमाल’ असे म्हंटले आहे.
हे देखील वाचा: ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं ऐकून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं बारामती तालुक्याचं खरं नाव….
तर अनेक चाहत्यांनी त्यांच्या या व्हील पावरची दाद दिली आहे. अविनाश यांच्या पत्नी जेष्ठ अभिनेत्री ऐश्वऱ्या नारकर या सुद्धा स्वतःला फिट ठेवण्यासाठी नेहमी योगासने करताना दिसतात. परंतु अविनाश यांनी योगासन करतानाचा व्हिडीओ पहिल्यांदा चं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Avinash Narkar Yoga )
हे देखील वाचा: ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं ऐकून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं बारामती तालुक्याचं खरं नाव….
अविनाश यांनी एकेकाळी मोठा पडदा गाजवला आहे. त्यांच्या उत्तुंग अभिनयाने त्यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अविनाश नारकर यांचा जन्म मुंबईतला असून त्यांचे बालपण परळ मध्ये गेलं आहे. अविनाश नारकर आता आपल्याला छत्तीस गुणी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटला येत आहेत.
अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला तब्बल छत्तीस वर्षे पूर्ण झाली असून, अजून देखील हे कपल मनाने यंग आहे. त्या दोघांना कामातून वेळ मिळाल्या नंतर ते दोघे एकत्र फिरायला जातात. आणि एकत्र वेळ घालवतात. ऐश्वर्या देखील सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहे.