स्त्री प्रधान अनेक मालिका, चित्रपट, नाटक यांची निर्मिती आज बहुतांश ठिकाणी केली जाते. स्त्रीच आयुष्य हे कस स्वातंत्र्य असावं या वर भाष्य करणारी आणखी एक मालिका म्हणजे झी मराठी वरील ‘तू चाल पुढं’. एका स्त्रीची स्वप्न आणि संसार या मध्ये येणाऱ्या अडचणी या भोवती मालिकेचं कथानक फिरत. मालिकेतील प्रमुख पात्र अश्विनी हे अभिनेत्री दीपा चौधरी ने साकारली आहे.(Deepa Chaudhari new look)
‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच मन जिंकलं. स्त्री प्रधान असलेल्या या मालिकेत अश्विनीची तारेवरची कसरत नेहमीच पाहायला मिळाली. या मालिकेतील अश्विनी हे पात्र अभिनेत्री दीपा परब साकारताना दिसतेय. मालिकेत अश्विनीची मिसेस इंडिया साठी सुरु असलेली तयारी पाहायला मिळाली. मात्र कुटुंबाची जबाबदारी आणि नवर्याच्या शब्दाखातर ती तिचा प्रवास थांबवते.
अश्विनी ने अनेक अडचणींचा सामना करून तिची स्वप्न पूर्ण केलं आहे. अनेक स्त्रियांना अश्विनीने प्रेरित केल्याचं पाहायला मिळतंय. मालिकेत साधी सरळ राहणाऱ्या अश्विनीचा नवीन लुक सध्या चांगलाच चर्चेत आहे. नेहमी साधारण रूपात दिसणाऱ्या अश्विनच्या रूपात आता बदल झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नवीन लुक मधील काही फोटोज दीपाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत. आणि तिने कॅप्शन मध्ये ‘ अश्विनीचा नवीन लूक…????’ असं देखील लिहिलं आहे.(Deepa Chaudhari new look)
तू चाल पुढं ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री दीपा चौधरी सोबत या मालिकेत धनश्री कडगावकर, वैष्णवी कल्याणकर, आदित्य वैद्य आणि अन्य कलाकार ही मुख्य भूमिकेत दिसत आहेत.