जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं तुमच्या आमच्याच काय संपूर्ण राष्ट्राच्या कानात चिरकाल वाजत राहील. राज्य गीताचा दर्जा प्राप्त झालेल्या या गीताची उत्पत्ती करणारे महाराष्ट्र शाहीर मात्र बऱ्याच ठिकाणी अपरिचित राहिले. महाराष्ट्राचा शाहिरांच्या जीवनाचा आढावा घेणारा भव्यदिव्य चित्रपट ‘ महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात येणार आहे.(Sharad Pawar on Baramat)
या चित्रपटातील ‘ जय जय महाराष्ट्र माझा ‘ हे गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं. राज्यगीत असा दर्जा प्रप्त झालेल्या गाण्याच्या प्रदर्शनाला महाराष्ट्रच्या राजकारणातील केंद्रबिंदू मानले जाणारे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थति लावली होती. तसेच महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील हे गाणं अजय गोगावले यांनी गायलं आहे.
गाणं ऐकून शरद पवार यांनी गाण्यातील एका कडव्या बद्दल माहिती सांगितली आहे. बारामती आणि जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याच नक्की काय कनेक्शन आहे शरद पवार यासंदर्भात बोलताना म्हणाले या गाण्यातील भीमथडी या शब्दाचं अर्थ भिमानदीच्या काठावर असा होतो याच भिमानदीच्या काठावर एक गाव वसलं होत ज्याचं नाव भीमथडी असं होत हे नाव १९४७ नंतर बदलून बारामती असं करण्यात आलं. ज्यामुळे हे गाणं ऐकलं कि अजूनही आमचा उर गर्वाने भरून येतो अशी शरद पवार यांनी सांगितलं.(Sharad Pawar on Baramat)