प्रसाद ओक आणि मंजिरी ओक ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. प्रसाद ओक हा प्रसिद्ध अभिनेता तसेच दिग्दर्शक असून त्याची पत्नी मंजिरी ओक तिचा व्यवसाय सांभाळत त्याच्या कामाला नेहमी हातभार लावत असते. तसेच ते दोघे एकमेकांसोबत इंस्टाग्रामवर धम्माल व्हिडियो देखील बनवताना दिसतात. नुकतीच प्रसादने त्याच्या इंस्टाग्रामवर “प्रत्येक नवऱ्याची अवस्था” म्हणून एक विनोदी रील शेअर केली होती.प्रसाद नंतर आता मंजिरीने सुद्धा एक विनोदी रील शेअर केली आहे.(prasad oak manjiri oak)
====
हे देखील वाचा – ‘मेरा मयार नहीं मिलता…’ दोस्तासाठी पृथ्वीकचं भावनिक पत्र
====
या व्हिडियोत ‘मंजिरी जेवत असताना जर तिला ठसका लागला तर नवरा पाणी देणारा पाहिजे अशी ती अपेक्षा करते परंतु तिला ठसका लागल्यानंतर डोक्यात टपली मारणारा नवरा तिला मिळाला आहे” असं या व्हिडियोत तिने दाखवण्याचा प्रयत्न केलाय.”ठीके आता काय love you too prasad” असं मिश्किल कॅप्शन सुद्धा तिने या व्हिडियोला दिले. चाहते देखील या व्हिडियोची मजा घेत प्रसादला दोष देत आहेत. तर अनेकांनी हसणाऱ्या इमोजींचा पाऊस मंजिरीच्या कमेंट बॉक्समध्ये पडला आहे.

Mr&Mrs ओक यांचं अजून एक मजेशीर रील
चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी प्रसाद आणि मंजिरी असे व्हिडियो शेअर करत असतात, परंतु प्रसाद आणि मंजिरीने एकमेकांना साथ देत त्यांचे करियर घडविले आहे. त्यामुळे मंजिरीचं त्याच्या आयुष्याची संघिनी आहे असं तो संधी मिळेल तेव्हा सांगायला विसरत नाही. प्रसाद जेव्हा स्ट्रगल करत होता तेव्हा मंजिरीने त्याची पावला पावलाला साथ दिल्याचे तो सांगतो. मंजिरीने प्रसादसोबत हिरकणी आणि चंद्रमुखी या दोन्ही चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल आहे. तसेच मंजिरीच स्वतःच ज्वेलरी ब्रँड सुद्धा आहे. (prasad oak manjiri oak)
====
हे देखील वाचा – ‘खूप उशिरा आलात हो या इंडस्ट्रीत’… ‘या’ दिग्गजांच्या कौतुकाने मामा झालेले भावुक
====
प्रसाद आणि मंजिरी हे दोन मुलांचे आई वडील असून त्यांचा मोठा मुलगा भारताबाहेर शिकायला आहे आणि लहान मुलगा त्यांच्या जवळ राहतो. प्रसाद आणि मंजिरी त्यांच्या कामामध्ये नेहमी व्यस्त असले तरी त्यांनी मुलांना कायम वेळ दिलाय आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार देखील केले आहेत. आयुष्य जगत असताना त्याचा आनंद घेत ते कस जगायचं याचे मंजिरी आणि प्रसाद योग्य उदाहरण आहेत.