खर आयुष्य असो वा पडद्यावरचं पडद्यानिमित्त जोडली गेलेली नाती कायम लक्षात राहणारी असतात. परिशुद्ध भावनेतून निखळ स्वरूपाची मैत्री फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यजत्रेत देखील अशी एक मित्रांची जोडी आहे ज्यांना हक्काने नवरा बायको म्हणून चिडवलं जात. या जोडीचं नाव आहे अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेता ओंकार राऊत.(pruthvik pratap onkar raut)
हे देखील वाचा – पंढरीच्या विठुराया चरणी तल्लीन होणार ‘देवबाभळी दिंडी–धावा जनामनाचा…
व्हॅलंटाईने डे निम्मित इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीक ने आपल्या जवळच्या मित्राला म्हणजेच ओंकार राऊतला मैत्रीमधल्या प्रेमाची व्याख्या सांगत पत्र लिहिले. आपल्या आयुष्यातील फक्त प्रियकर किंवा प्रियसी सोबतच व्हॅलंटाईने डे साजरा करावा असा नियम नसतो. मैत्रीतही तेवढ्या निखळ भावनेचं प्रेम असू शकतं. पृथ्वीकच्या या पत्रातून हेच मित्रप्रेम पाहायला मिळतं.

पृथ्वीक ने ओंकारसाठी लिहिलेल्या पत्रात तो लिहितो ‘ प्रिय बायको, त्यावर ओंकार ने असून दिलं आम्हाला सेटवर नवरा बायको म्हणलं जात. मित्र तू नेहमी माझ्या सुख- दुःखात असतोस, मी तुझ्यावर रागावतो, रुसतो मी हा माझा अधिकार समजतो. तू तुझं प्रेम कधी बोलून दाखवत नाहीस. आपल्या आवडत्या ओळी या क्षणी बोलून दाखवतो म्हणत पृथ्वीक ने त्यांच्या मैत्री साठी एक खास शेर त्या पात्रात लिहिला होता तो शेर असा होता ‘ मेरा मयार नहीं मिलता मैं आवारा नहीं फिरता ना सोच मेरे बारे मैं इतना में दोबारा नहीं मिलता’(pruthvik pratap onkar raut)
कलाकारांची मैत्री ही फक्त पडद्यावर दिसते तेवढीच नसते तर त्या मैत्रीत कुठेतरी अशी सत्यता ही दडलेली असते. पृथ्वीकच्या या पत्रावरून मैत्री अशी असावी की लोकांनी नवरा बायको असल्यासारखे राहतात असं म्हणावं.पृथ्वीक सोबतच अन्य कलाकारांनी ही त्यांच्या जवळच्या मित्रांना पत्र लिहीत व्हॅलंटाईने डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. हास्य जत्रतेतील काही कलाकार आता पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत सुद्धा दिसून येतात.(pruthvik pratap onkar raut)