शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केली महागडी कार, व्हिडीओ शेअर करत दिली आनंदाची बातमी, कलाकारांनीही केलं कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 8, 2023 | 12:06 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
man dhaga dhaga jodte nava serial fame marathi actress divya pugaonkar bought news car video shared on instagram

Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केली महागडी कार, व्हिडीओ शेअर करत दिली आनंदाची बातमी, कलाकारांनीही केलं कौतुक

मराठीतील अनेक कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत नाव कामावतात. मालिकांमधून अभिनय करत ते प्रेक्षकांची मनं जिंकतात. याकाळात त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. मात्र मेहनत व कष्ट करत ते स्वत:ची स्वप्नेही पूर्ण करतात. यात काहींचचं घर घेण्याचे स्वप्न असतं, तर काहींचं गाडी घेण्याचे. हीच मेहनत कायम ठेवत ते त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास करतात आणि कालांतराने त्यांची स्वप्ने पूर्णही होतात. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती झाली आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. दिव्याचे गाडी घेण्याचे स्वप्न होते आणि अखेर तिच्या या स्वप्नांची पूर्तता झाली आहे.  (Divya Pugaonkar On Instagram)

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. मालिकेत ‘माऊ’ या मुक्या मुलीच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. या मालिकेनंतर ती लगेच ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. दिव्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांमबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे तिने नवीन कार घेतल्याची बातमी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Divya Pugaonkar (@divyasubhashpugaonkar_official)

आणखी वाचा – “घरात ज्यांना काडीची किंमत नसते…” , सोशल मीडियाचा वापर न करण्याबाबत उपेंद्र लिमयेंचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनेकजण खोटे…”

दिव्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने नवीन कार घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. “शेवटी माझी राणी आली आहे” असं म्हणत तिने गाडी घेतानाचे काही खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. दिव्याने शेअर केलेल्या या  व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर तिचा खास मित्रदेखील दिसत आहे. तसेच या व्हिडीओखाली गिरिजा प्रभू, रेश्मा शिंदे, पूजा बिरारी, आकाश नलावडे, अभिषेक रहाळकर, सिद्धार्थ खिरीद, कोमल कुंभार, अमेय बर्वे, नंदिता पाटकर, ऋतुजा कुलकर्णी, शर्वरी जोग या मराठी कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – कॅन्सरसारख्या आजाराशी ज्युनियर महमूद यांची झुंज ठरली अपयशी, हे होते शेवटचे शब्द, म्हणाले, “माझ्या मृत्यूनंतर…”

दरम्यान, दिव्या सध्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  ही मालिका एका विवाहित महिलेचा घटस्फोट आणि त्यानंतर तिला करावा लागणारा संघर्ष या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करते. या मालिकेत दिव्या ‘आनंदी’ नावाचे पात्र साकारत असून तिच्या पात्राला चांगलीच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्याचबरोबर मालिकेचे कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे. त्यामुळे कमी काळात या मालिकेने व दिव्याच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.           

Tags: divya shubhashentertainment newsman dhaga dhaga dodte nawamarathi actressmarathi entertainmentMarathi newsmarathi serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Upendra Limaye On Social Media

"घरगुती सोहळ्याचा बाजार…", लेकीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होणं उपेंद्र लिमयेंना पटलं नाही अन्…; स्पष्टच बोलले, म्हणाले, "मुलीच्या मेकअप आर्टिस्टने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.