अभिनेता टोविनो थॉमसचा ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या दाक्षिणात्य चित्रपटाची पुढील वर्षी पार पडणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून याची घोषणा करण्यात आली आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपट यावर्षीच्या मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. (2018 film are selelcted for Oscars 2024)
जूड अँथनी जोसेफ दिग्दर्शित हा चित्रपट २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या भीषण पूरस्थितीवर आधारित आहे. या भीषण परिस्थितीत तिथल्या नागरिकांनी माणुसकी दाखवत कश्याप्रकारे एकमेकांची मदत केली होती व या स्थितीवर मात केली, हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात टोविनोसह कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. ५ मे २०२३ मध्ये हा चित्रपट आधी मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला. त्यानंतर तो हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. अवघ्या १२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १०० हून अधिक कोटींची कमाई केली होती.
हे देखील वाचा – ‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग
Malayalam film "2018- Everyone is a Hero" India's official entry for Oscars 2024: Film Federation of India
— Press Trust of India (@PTI_News) September 27, 2023
कन्नड चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या नेतृत्वाखालील ज्युरींनी या चित्रपटाची निवड केली आहे. या चित्रपटाबरोबर ‘द केरला स्टोरी’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’, ‘बालगम’ आणि ‘वाळवी’, ‘बापल्योक’ हे मराठी चित्रपटदेखील ऑस्करच्या शर्यतीत होते. पुढील वर्षी १० मार्च रोजी हा सोहळा रंगणार आहे. दरम्यान, मुख्य नायक टोविनो थॉमसने सोशल मीडियावर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा – Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक
याआधीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘छेल्लो शो’, ‘गली बॉय’, ‘जलीकट्टू’ यांसारख्या चित्रपटांना भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून पाठवण्यात आले होते. गेल्यावर्षी ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ डॉक्युमेंट्री व RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरलं होतं.