शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 27, 2023 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita Lokhande and husband Vicky Jain in Bigg Boss 17

'बिग बॉस १७'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

हिंदी टीव्हीजगतातील प्रसिद्ध व तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा १७वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. याचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहे. (Ankita Lokhande and husband Vicky Jain in Bigg Boss 17)

बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाची थीम सिंगल विरुद्ध कपल असणार आहे. त्यामुळे या पर्वात टीव्ही विश्वातील नावाजलेल्या कलाकारांसह काही प्रसिद्ध जोड्या बिग बॉसच्या घरात अवतरणार आहे. यंदाच्या पर्वात कोण सहभागी होणार, हे अधिकृतरीत्या समोर आलं नाही. पण, ‘पवित्र रिश्ता’ फेम मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा – Tiger 3 Teaser : “जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं”, ‘टायगर ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’च्या या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विक्की जैनसह सहभागी होणार आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी अंकिता आणि विक्कीने शॉपिंगला सुरुवात केली आहे. दोघांनी आतापर्यंत २०० ड्रेसची खरेदी केली असून ते या शोमध्ये एकही ड्रेस पुन्हा वापरणार नाही, याचं नियोजन त्यांनी केलं आहे. याआधी अभिनेत्री हिना खानने बिग बॉसच्या ११व्या पर्वात एकही ड्रेस रिपीट केला नव्हता.

BREAKING! Confirmed couple: Ankita Lokhande & Vicky Jain to take approx. 200 outfits inside Bigg Bose 17.

As per the report, They have purchased 200 outfits and plan on not repeating their clothes inside the house.

In the past season, BB11 Runner-up Hina Khan didn't repeat her… pic.twitter.com/oVlbDtzx9k

— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) September 26, 2023

हे देखील वाचा – मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरिजमध्ये एण्ट्री, अभिनेत्रीच्या हटके लूकने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Vikas Jain (@realvikasjainn)

दरम्यान, बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात कोण-कोण सहभागी होणार? हे निर्मात्यांनी जाहीर केलं नाही. पण या पर्वासाठी अंकिता आणि विक्कीचं नाव पक्कं झालं आहे. त्याचबरोबर ‘बिग बॉस ओटीटी’ मधील एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा रानी यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. शिवाय, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिक हेदेखील यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. १५ ऑक्टोबरपासून हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: ankita lokhandebigg boss 17Televisionvicky jain
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Prabhakar More On Shalu Dance

Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.