बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 27, 2023 | 2:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prabhakar More On Shalu Dance

Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची क्रेझ संपूर्ण जगभरात पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांना हास्यजत्रेने एक स्वतःची अशी ओळख निर्माण करून दिली आहे. यापैकीच एक कलाकार म्हणजे हास्यवीर प्रभाकर मोरे. (Prabhakar More On Shalu Dance)

प्रभाकर मोरे त्यांच्या कोकणी बोलीभाषेने प्रेक्षकांना नेहमीच हसवतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रभाकर मोरे यांचे आगळेवेगळे पात्र रसिक प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडते. हास्यजत्रेतून ‘चिपळूणचा पारसमणी’ म्हणून ओळख मिळवणारे अभिनेते प्रभाकर मोरे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त नृत्य शैलीमुळे चर्चेत असतात. प्रभाकर मोरे यांचा शालू डान्स जगभरात प्रसिद्ध आहे.

आणखी वाचा – मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”

View this post on Instagram

A post shared by Bhavna Sawant (@bhavnasawant142306)

सध्या प्रभाकर मोरे यांच्या शालू डान्सची एक झलक सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रभाकर मोरे यांनी चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. चाहत्यांच्या इच्छेखातर त्यांनी चाळीतच ‘शालू’ गाण्यावर ठेका धरला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे त्यांच्या खास शैलीमध्ये ‘शालू झोका दे गं मैना…’ हे गाणं गाताना दिसत आहेत. तसेच या गाण्यावर ते स्वत: तर डान्स करतच आहेत, त्याचबरोबर चाहत्यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतोय. दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रभाकर मोरे यांच्या साधेपणाचा कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

कोकणवासी असलेल्या प्रभाकर मोरेंनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. सांस्कृतिक पदाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभाकर मोरे सांभाळत आहेत. प्रभाकर मोरे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच विशेष पसंती मिळते. प्रभाकर मोरे हे आपल्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. ‘पांघरुण’, ‘टकाटक’, ‘कुटुंब’, ‘कट्टी बट्टी’, ‘बाई गो बाई’, ‘भाई-व्यक्‍ती की वल्ली’, ‘धोंडी चम्प्या – एक प्रेमकथा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांमधील प्रभाकर मोरे यांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyajtramhjprabhakar moreprabhakar more fansprabhakar more on shalu dance
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
2018 film are selelcted for Oscars 2024

ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून दाक्षिणात्य चित्रपटाची अधिकृत एंट्री, पण बॉलिवूडसह मराठी चित्रपट मागे का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.