शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन, वयाच्या ३७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 23, 2024 | 6:04 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Malayalam actor Nirmal Benny passed away at the age of 37 due to a heart attack.

मल्याळम अभिनेते निर्मल बेनी यांचे निधन वयाच्या ३७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nirmal Benny Passed Away : मल्याळम सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अभिनेते निर्मल बेनी यांचे २३ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने सर्व चाहत्यांना धक्का बसला. निर्मल बेनी असं त्यांचं नाव असून ते ३७ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे. निर्मल बेणी यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या अनेक चाहत्यांना व निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. तसंच त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. निर्मल बेनी यांच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र आणि निर्माता संजय पडियूर यांनी दिली. (Nirmal Benny Passed Away News)

सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. संजय यांनी सोशल मीडियावर मित्रासाठीची भावुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. निर्मल बेनी यांच्या निधनाची दुःखद माहिती देत संजय या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “माझ्या प्रिय मित्राला निरोप देताना… ‘आमेन’मधील कोचाचनची भूमिका आणि त्याने माझ्या ‘दूरम’मध्ये साकारलेली महत्त्वाची भूमिका खूप गाजली. पण आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. माझ्या प्रिय मित्राच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना”.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Padiyoor (@sanjaypadiyoor)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : लग्नानंतर स्वतःचं आडनावही बदलनार नाही कोकण हार्टेड गर्ल अंकिता, Bigg Boss मध्ये खुलासा, म्हणाली, “मी पुन्हा…”

निर्मल बेनी हे प्रतिभावान अभिनेते होते. कॉमेडियन म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि अनेक स्टेज शो केले. निर्मल बेनी यांना केवळ यूट्यूब व्हिडिओ आणि स्टेज शोच्या माध्यमातून ओळख मिळाली. निर्मल बेनी यांनी डिजिटल मीडियाच्या जगातही आपला ठसा उमटवला होता. निर्मल बेनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. लिजो जोस पेलिसरीच्या ‘आमेन’ चित्रपटातील कोचाचन (छोटा पुजारी) या भूमिकेने तो प्रसिद्ध झाला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आंघोळीला जाण्यासाठी अरबाजचे पाय धरतोय छोटा पुढारी, बाकीचेही त्यामुळे रखडले, सूरज चव्हाण मध्येच आला अन्…

दरम्यान, २०१२ मध्ये ‘नवगाथरक्कू स्वागतम’ या चित्रपटाने त्यांची फिल्म इंडस्ट्रीतील कारकीर्द सुरू झाली आणि त्यांनी ‘आमेन’ आणि ‘दूरम’सह एकूण पाच चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अकाली निधनाने सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असून एक पोकळी निर्माण झाली आहे.

Tags: Nirmal Beni passed awayNirmal BennyNirmal Benny passed away Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi : टीआरपीच्या शर्यतीत रितेश देशमुखने मारली माजी, बायकोनेही केलं तोंड भरुन कौतुक, पण प्रेक्षकांचं म्हणणं काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.