Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सध्या हे पर्व सगळेच स्पर्धक गाजवताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झालं तेव्हापासून छोट्या पडद्यावर या शोने प्रेक्षक वर्गाला खिळवून ठेवलं आहे. यंदाच्या सीझनचा होस्ट बदलला हे समोर आलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. याआधीच्या सर्व सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी महेश मांजरेकर यांनी उत्तम रित्या साकारली होती. प्रत्येक विकेंडला महेश मांजरेकर त्यांच्या चावडीवर स्पर्धकांची शाळा घ्यायचे. यंदाच्या पर्वात ही जागा आता भाऊच्या धक्क्याने घेतली आहे.
शो सुरु झाल्यापासूनच सोशल मीडियावर रितेशची मांजरेकरांबरोबर तुलना होताना पाहायला मिळाली. प्रेक्षक नाराज असले तरी, भाऊच्या धक्क्यानं टेलिव्हिजन वरील अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. ‘भाऊचा धक्का’ या ‘बिग बॉस मराठी’मधील रितेशच्या वीकेंड स्पेशल एपिसोडने गेल्या आठवड्यात चांगलाच धुमाकूळ घातला. मागील आठवड्यात भाऊचा धक्काने एपिसोडला ३.२ TVR मिळवला. त्यांनतर आता गेल्या आठवड्यात ३.९ TVR मिळवला आणि टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले. ही पोस्ट रितेशने आणि कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे.
आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनला सासरकडच्या घराची ओढ, नवऱ्याचा भजन करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “तिथली आठवण…”
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखला पाहून अनेकांनी त्याच स्वागत केलं. तर काहींनी रितेश योग्य न्याय देत नसल्याचं म्हणत ट्रोलही केलं. तीन आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने स्पर्धकांची शाळा घेतली. त्यावेळी त्याने काय चूक, काय बरोबर हे सांगितलं मात्र अनेकांना रितेशच बोलणं पटलं नाही. बरेचदा रितेशने टीम अ चा मुद्दा चुकीचा असल्याचं म्हणत त्यांची शाळा घेतली मात्र त्यांची बाजू बरोबर असल्याचं म्हणत त्यांना पाठीशीही घातलेलं दिसलं. यामुळे प्रेक्षकवर्ग रितेशवर नाराज असलेले दिसले.
आणखी वाचा – “इरिनाच घराबाहेर जाईल अन्…”, मराठी अभिनेत्रीने वैभवला डिवचलं तर जान्हवीबाबत म्हणाली, “नावाची लायकी…”
कलर्स मराठी वाहिनीवर भाऊचा धक्का या कार्यक्रमाचा TVR रेट वाढलेली पोस्ट शेअर करण्यात आली. यावर अनेकांनी कमेंट केलेल्या दिसल्या. दरम्यान, अनेकांनी सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान हा TVR रेट वाढवण्यात सूरज चव्हाणच नाव घेण्यात आलं. सूरज चव्हाण व धंनजय पोवारला पाहण्यासाठी ते हा शो बघतात असे उत्तर अनेकांनी दिलं. तर रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया देशमुखनेही TVR रेटची पोस्ट शेअर करत “कोण आहे बॉस- रितेश देशमुख”, असं म्हणत नवऱ्याचं कौतुक केलं आहे.