Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरातील भांडण, वादविवाद जितके चर्चेत येतात, तितकेच या घरातील काही खास नात्यांचीदेखील चांगलीच चर्चा रंगताना दिसत. एकत्र राहिल्यामुळे घरातील स्पर्धकांचा एकमेकांशी खास बॉण्ड तयार होतो. टास्कवेळी या स्पर्धकांमध्ये दुश्मनी दिसत असली तरी टास्कव्यतिरिक्त त्यांच्यातील मजामस्ती प्रेक्षकांना पाहायला आवडते. या घरात आल्याबरोबर घन:श्याम, अरबाज, वैभव यांच्यात चांगली मैत्री झालेली पाहायला मिळत आहे. “मी या घरात सर्वांशी प्रेमाने वागणार” असं म्हणणारा घन:श्याम त्याच्या त्याच्या वागणुकीने सर्वांची मनं जिंकत आहे. अशातच आता घन:श्यामचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याची अरबाजबरोबरची मजामस्ती पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अरबाज घन:श्याम यांच्यातील धमाल मजामस्ती पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज व घन:श्याम यांच्यात अंघोळीला जाण्यावरुन मजामस्ती करतं आहेत. घन:श्याम अरबाजला आंघोळीला जायला सांगत आहे. तर अरबाज त्याला “तू गेल्याशिवाय मी जाणार नाही” असं म्हणत आहे. इतक्यात तिथे सूरज येतो आणि तुमच्या दोघांच्या नादात किती वीळ वाया जात आहे” असं म्हणताना दिसत आहे.
यानंतर अरबाज अंघोळीला जातो आणि तो खूप वेळ लावत असल्याने घन:श्याम त्याला “आम्हाला पण आंघोळ करू दे” असं म्हणत आहे. बिग बॉसचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा नवीन् प्रोमो अनेकांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरातील हा गोंधळ उडाला आहे, कारण ‘बिग बॉस’ने दिलेला ट्विटस, या घरात ‘बिग बॉस’ने कॅप्टन्सी टास्क पूर्ण न केल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांकडून सर्व सुखसुविधा काढून घेतल्याने सर्वांना एकच बाथरूम व वॉशरूम वापरावे लागत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या येत्या आठवड्यात घरातील एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. वैभव, इरीना, अभिजीत व आर्या यांपैकी आता कोण बाहेर जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.