शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मलायका अरोराच्या आयुष्यातून अर्जुन कपूरचा पत्ता कट?, मिस्ट्री मॅनबरोबर परदेशात करतेय एन्जॉय, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 18, 2024 | 11:16 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Malaika Arora shared photo with mystery man from Spain sparked rumors that she is in love once again.

मलायका अरोराच्या आयुष्यातून अर्जुन कपूरचा पत्ता कट?, मिस्ट्री मॅनबरोबर परदेशात करतेय एन्जॉय, फोटो व्हायरल

बॉलिवूडची फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा दीर्घकाळाचा प्रियकर अर्जुन कपूरबरोबरच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. या ब्रेकअपच्या अफवांमध्ये मलायका आणि अर्जुनने अनेक वेळा पोस्टही शेअर केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याबाबत उघडपणे अधिकृतपणे भाष्य केले नाही. एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा असताना मलायका स्पेनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करायला गेली आहे. यावेळी तिच्याबरोबर एक व्यक्ती दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मलायका अरोरा ही सध्या स्पेनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे स्पेनमधील तिच्या चार फोटोंचा कोलाज बनवून शेअर केला आहे. एका फोटोत मिस्ट्री मॅन हातात ज्यूसचा ग्लास घेऊन दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मलायकाने तिचा सेल्फी फोटो पोस्ट  केला आहेकरताना दिसत आहे. एका फोटोमध्ये खाद्यपदार्थ दिसत आहे. तर  आणखी एका फोटोत पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेली एक अनोळखी व्यक्ती दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच मलायका प्रेमात पडली असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. आता ही व्यक्ती नक्की आहे तरी कोण?, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

आणखी वाचा – “आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, “आईने ६५व्या वर्षी…”

मलायका ही सध्या मार्सेलमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. पण तिने तिच्या सोबतीबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. सुट्टीमुळे ती अंबानींच्या लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही. मात्र, यावेळी त्यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नवविवाहित जोडप्याचे फोटो शेअर करत तिने “अनंत आणि राधिका तुमच्या नवीन अध्यायात तुम्ही एकत्र पाऊल टाकताना तुम्हा दोघांनाही जगातील सर्व सुखाच्या शुभेच्छा” असं म्हटलं आहे. मलायकाबरोबरच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान अर्जुन कपूर अनंत-राधिकाच्या लग्नात एकटाच एन्जॉय करताना दिसला होता.

आणखी वाचा – धक्कादायक! चित्रपटाच्या सेटवर २० फूट उंचीवरुन पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर व मलायका अरोरा आता वेगळे झाले आहेत. मात्र दोघांनीही यावर उघडपणे कधीच प्रतिक्रिया दिली नाही. दोघेही बराच काळ एकत्र दिसले नाहीत. अर्जुनने तिच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. पण यावेळी मलायका अनुपस्थित होती.

Tags: Bollywood entertainment newsmalaika aroraMalaika Arora Mystery Man Photo
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Rai and Abhishek bachchan House

सासू-सासऱ्यांबरोबर राहत नाही ऐश्वर्या बच्चन, अभिषेक बच्चनने स्वतःच केला खुलासा, म्हणाला, "माझे आईवडील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.