ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. समोर आलेल्या बातम्यांनुसार हे जोडपे वेगळे होत आहे. मात्र, दोघांनीही याबाबत मौन बाळगले आहे. अनंत-राधिकाच्या लग्नात अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबासह दाखल झाला तेव्हा या मतभेदाची बातमी समोर आली. ऐश्वर्या रायने मुलगी आराध्याबरोबर वेगळी एन्ट्री केली होती. अभिषेक व ऐश्वर्याला वेगळे पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. एकेकाळी हे जोडपे नेहमीच चर्चेत असतात आणि आता ते वेगळे दिसत आहेत त्यामुळे चर्चा रंगली आहे. (Aishwarya Rai and Abhishek bachchan House)
ऐश्वर्याचे तिचे सासरे अमिताभ बच्चन व सासू जया बच्चन यांच्याबरोबर जमत नाही. लग्नानंतर ऐश्वर्या व अभिषेक जलसामध्ये सासरच्यांबरोबर राहत नाहीत. खुद्द अभिषेकनेच याचा खुलासा केला होता. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या यांना एक मुलगी आराध्या आहे. ऐश्वर्या आपल्या मुलीचे संगोपन खूप छान करत आहे. अभिषेकनेही अनेकदा मुलाखतींमध्ये हे सांगितले आहे. एकदा ‘मनमर्जिया’च्या प्रमोशनदरम्यान अभिषेकने तो कुठे राहतो हे सांगितले होते.
‘मनमर्जियां’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चन व विकी कौशल एकत्र होते. मुलाखतीत विकीला अभिषेकच्या आयुष्यावर प्रश्न विचारले जात होते. यावेळी त्याला असे विचारण्यात आले की, अभिषेकच्या घराचे नाव काय आहे. बराच वेळ विचार करुन विकी म्हणाला, “जलसा”. हे उत्तर चुकीचे असल्याचे अभिषेकने सांगितले. त्यावर सगळ्यांच्या नजरा अभिषेकच्या उत्तराकडे लागून राहिल्या. अभिषेक म्हणाला, “माझे आईवडील जलसा येथे राहतात. मी त्याच्या शेजारी असलेल्या वत्समध्ये राहतो. अभिषेकच्या या उत्तरानंतर ऐश्वर्या सासरच्यांबरोबर राहत नसल्याचा अंदाज सर्वजण बांधत होते”.
ऐश्वर्या व अभिषेक यांच्यातील मतभेदाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. ऐश्वर्याबरोबर कोणत्याही फंक्शनमध्ये तो दिसत नाही. अभिनेत्रीच्या वाढदिवशीही तो तिच्याबरोबर नव्हता. ऐश्वर्याने तिचा वाढदिवस आई व मुलीबरोबर साजरा केला.