बॉलिवूडची फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा दीर्घकाळाचा प्रियकर अर्जुन कपूरबरोबरच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. या ब्रेकअपच्या अफवांमध्ये मलायका आणि अर्जुनने अनेक वेळा पोस्टही शेअर केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याबाबत उघडपणे अधिकृतपणे भाष्य केले नाही. एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा असताना मलायका स्पेनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करायला गेली आहे. यावेळी तिच्याबरोबर एक व्यक्ती दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मलायका अरोरा ही सध्या स्पेनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे स्पेनमधील तिच्या चार फोटोंचा कोलाज बनवून शेअर केला आहे. एका फोटोत मिस्ट्री मॅन हातात ज्यूसचा ग्लास घेऊन दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मलायकाने तिचा सेल्फी फोटो पोस्ट केला आहेकरताना दिसत आहे. एका फोटोमध्ये खाद्यपदार्थ दिसत आहे. तर आणखी एका फोटोत पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेली एक अनोळखी व्यक्ती दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच मलायका प्रेमात पडली असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. आता ही व्यक्ती नक्की आहे तरी कोण?, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

मलायका ही सध्या मार्सेलमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. पण तिने तिच्या सोबतीबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. सुट्टीमुळे ती अंबानींच्या लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही. मात्र, यावेळी त्यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नवविवाहित जोडप्याचे फोटो शेअर करत तिने “अनंत आणि राधिका तुमच्या नवीन अध्यायात तुम्ही एकत्र पाऊल टाकताना तुम्हा दोघांनाही जगातील सर्व सुखाच्या शुभेच्छा” असं म्हटलं आहे. मलायकाबरोबरच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान अर्जुन कपूर अनंत-राधिकाच्या लग्नात एकटाच एन्जॉय करताना दिसला होता.
आणखी वाचा – धक्कादायक! चित्रपटाच्या सेटवर २० फूट उंचीवरुन पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर व मलायका अरोरा आता वेगळे झाले आहेत. मात्र दोघांनीही यावर उघडपणे कधीच प्रतिक्रिया दिली नाही. दोघेही बराच काळ एकत्र दिसले नाहीत. अर्जुनने तिच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. पण यावेळी मलायका अनुपस्थित होती.