काल मलायका अरोराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं दिसलं. मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. मलायका अरोराने तिचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाच्या वृत्ताला पोस्ट करत दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांच्या निधनाची बातमी दिली असून तिचे वडील चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये तिने माध्यमांना व चाहत्यांना विनंतीही केली आहे. (Malaika Arora Statement On Father Demise)
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि ही बातमी मिळताच मलायकाच्या आईच्या घरी तारे-तारकांची गर्दी पाहायला मिळाली. मलायकाने आपल्या वडिलांच्या निधनाच्या बातमीवर एक पोस्ट शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
या पोस्टमध्ये मलायकाने लिहिले की, “आम्ही अत्यंत दु:खी मनाने घोषणा करत आहोत की आमचे प्रिय वडील अनिल मेहता आता आमच्यात राहिले नाहीत. तो एक सौम्य आत्मा, एक चांगला पिता, एक प्रेमळ पती आणि आमचा सर्वात चांगला मित्र होता”. मलायकाने पुढे लिहिले की, “आम्ही गमावलेल्या गोष्टींमुळे आमचे कुटुंब काळजीमध्ये आहे, त्यामुळे मी माध्यमांना व माझ्या हितचिंतकांना विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. कारण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही तुमची समज, समर्थन आणि आदर याला प्रोत्साहन देत आहोत”.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल अरोरा यांनी घराच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची बातमी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेला असून मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे. मलायका अरोरा शहराबाहेर होती तिला ही बातमी मिळताच ती मुंबईत परतली. या अपघातामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.