शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मूल होत नाही म्हणून हिणवलं…”, आई होऊ शकत नसल्याने ऐकावे लागले होते टोमणे, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “खूप त्रास…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 11, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sambhavna seth on ivf treatment

संभावना सेठने व्यक्त केल्या भावना

भोजपुरी अभिनेत्री व डान्सर संभावना सेठ नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर ती अनेक चित्रपट तसेच कार्यक्रमांमध्ये दिसून आली आहे. सध्या ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेली पाहायला मिळते. व्हिडीओच्या माध्यमातूनदेखील ती चाहत्यांच्या संपर्कात असलेली पाहायला मिळते. मात्र सध्या एका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री २०१६ साली अभिनेता अविनाश द्विवेदीबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नाला आता आठ वर्ष झाली मात्र ती अद्याप आई बनू शकली नाही. संभावनाने नुकताच आई होण्याबद्दल भाष्य केले आहे. तिने आपले अनुभव सांगितले आहे. (sambhavna seth on ivf treatment)

अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सांगितले की, “जेव्हा माझी आयव्हीफ सुरु झाली तेव्हा मी व्हीडीओ नाही बनवायचे. पण एके दिवशी मी याबद्दलचा व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला. लोक मला बघत होते. त्यामुळे मला त्यांना हे सगळं दाखवायचं होतं. लोक माझ्या शरीरावर प्रतिक्रिया द्यायचे, माझं वजन कमी झालं आहे असंही ते म्हणायचे. त्यामुळे मी नक्की कोणत्या परिस्थितिमधून जात आहे हे त्यांना दाखवायचे होते.

आणखी वाचा – मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या करत संपवलं जीवन, कठीण काळात पूर्वाश्रमीच्या पतीचा आधार, सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचला अन्…

View this post on Instagram

A post shared by Sambhavna Seth (@sambhavnasethofficial)

पुढे ती म्हणाली की, “काही लोक म्हणाले की मूल होत नाही. पण असं का आहे? याचं कारण तर समजून घ्या. आम्ही कोणत्या गावात रहात नाही. माझ्या  तब्येतीबद्दल खूप साऱ्या समस्या आहेत. त्यामुळे मी योग्य वेळी लग्न करु शकले नाही. माझ्या आयुष्यात खूप संघर्ष होता. जेव्हा मी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये काम करत होते तेव्हा मला खूप संघर्ष करावा लागला होता. कारण तिथे पैसे खूप कमी मिळायचे. इतकं सगळं झाल्यावर लोकांना वाटलं की मी लग्न करणार नाही पण मी लग्न केलं”.

आणखी वाचा – मलायकाच्या वडिलांनी ख्रिश्चन मुलीशी केलं होतं लग्न, इंडियन नेव्हीमध्ये होते कामाला, कुटुंबात आणखी आहे कोण-कोण?

पुढे तिने सांगितले की, “मी मूल होण्यासाठी खूप प्रयत्न केले. अनेकदा आयव्हीएफ सुद्धा असफल ठरल्या. मुल होत नाही, माझ्यातच काहीतरी कमी आहे असं मला अनेक बायका बोलल्या. त्यामुळे मी अनेकदा घरातील कार्यक्रमांना जाणंच बंद केलं. पण माझ्या पतीने मला खूप साथ दिली”. दरम्यान सध्या संभावना अभिनयापासून दूर गेलेलीदेखील दिसून येत आहे.

Tags: actressIVF treatmentSambhavna Seth
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 arbaaj and sangram fight

Bigg Boss Marathi : टास्कदरम्यान घरात ताकदीचा सामना होणार, अरबाज व संग्राम एकमेकांना भिडणार, नक्की बाजी कोण मारणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.