रिकाम असेल ते सारं माझं, असुदे भरलेलं असेल ते तुझं…
दुःख सारं माझ्या जवळ असुदे, खळखळून वाहेल ते सखे सुख तुझं….(Majja Poem)
चुकलेले हर एक पाऊल माझं असुदे कळून ही निभावलेल भाबडेपण तुझ
वळलेलं हर एक वळण माझं असुदे, अन पडणार पहिलं पाऊल तुझं
आठवतंय का ते सांग ते अलगद फसणं माझं, फसण्याचं कारण माझ्या हास्य तुझं
कर्तव्याच्या खाली अर्ध आयुष्य असेल माझं, बघ सखे सावर आताच मन तयार आहे का तुझं?
दिलेलं हर एक वाचन माझं असुदे, न सांगताही निभावणं कर्तव्य तुझं
मी विसरतो हल्ली खूप, आठवण न चुकता करून देण्याचं काम तुझं..
लिहिलं पत्र, मांडल्या भावना हे झालं माझं ,पण तरीही बरं नाही मौन तुझं
सांग मला किंवा लिही तू ही , उगाच दुनिया म्हणेल वागणं काही बरं नाही तुझं(Majja Poem)
समजा संपला अध्याय माझा मग तरी जाणवेल का अस्तित्व तुला तुझं?
होईन नाश भावनांचा मी बघेन माझं, सांग होईल का हिम्मत पुन्हा म्हणण्याची…… ‘तू बघ तुझं’ ?