‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ…’ ही ओळ ऐकली कि आपल्या समोर आपसूक एक नाव आणि डोळ्या पुढे प्रतिमा उभी राहते ती अभिनेते दादा कोंडके यांची. अनेक चित्रपट, नाटकं, आणि सामाजिक उपक्रम यांच्या साठी हे नाव कोणत्याही रसिकाच्या मनात कायमच राहिलं. चित्रपट निर्मतीच्या सोबतच दादांचा हातखंडा होता ते म्हणजे लोकनाट्य. दिवसरात्र, काळवेळ कसली ही मर्यादा न ठेवता दादांनी अजरामर अशी लोकनाट्य मनोरंजनसृष्टीला अर्पण केली.(Dada Kondke hotel incident)
बऱ्याचदा आपण म्हणतो कि कलाकार पडद्यावर दिसतो तेवढा रागीट नसावा किंवा तेवढा प्रेमळ देखील नसावा पण जशास तसे म्हणण्याचा दादांनी कधी खोटा प्रयत्न केला नसावा. याची प्रचिती येते दादांनी एका हॉटेलवाल्याच्या जिरवलेल्या खोडी वरून. दादा कोंडके लोकनाट्य करत असल्यामुळे अनेक माणसं त्यांना जोडली गेली काही क्षणासाठी होती तर काही अगदी शेवटच्या काळापर्यंत दादांसोबत होती. दादांचा काही काळ सहवास लाभलेल्या व्यक्तीने हा किस्सा सांगितला होता.
‘भरपूर खा ह्याला सोडायचं नाही….’ (Dada Kondke hotel incident)
दादा कोंडके यांचा पालघर येथे प्रयोग होता. प्रयोगाआधी कधी ही जेवण न करणारे दादा या वेळी मात्र आपल्या सवंगड्यांसोबत एका हॉटेल वर जेवण्यासाठी गेले असता तिथे त्यांना चपाती ऐवजी छोटे छोटे फुलके दिले गेले आणि ते दोनच घासांमध्ये संपूनही जात. पुढचं जेवण यायला त्यामुळे वेळ लागायचा कार्यक्रमला होणारा उशीर आणि हॉटेल वाल्याची दिरंगाई पाहून दादांना हॉटेलवालीची चाल समजली ह्यांना मुद्दाम उशिरा जेवण देऊन आयोजनकडून पूर्ण जेवणाचे पैसे उचलण्याचा बेत दादांच्या लक्षात आला आणि दादा साथीदारांना उद्देशून म्हणाले ‘आता कार्यक्रमाला उशीर झाला तरी चालेल, या हॉटेलवाल्याची चांगलीची खोड जिरवायची भरपूर खा’ मग काय दादा आणि त्यांच्या साथीदारांनी कोणताही विचार न करता एकामागोमाग एक फुलके मागवले आणि हॉटेल वाल्याला घुडके टेकायला भाग पाडलं त्यानंतर झालेला कार्यक्रमही चांगला झाला होता असं देखील त्या व्यक्तीने आठवणींना उजाळा देताना सांगितले.(Dada Kondke hotel incident)
दादा कोंडके हे कलाकार म्हणून उत्तम होतेच पण त्यांचा तोच करारीपण त्यांच्या रोजच्या राहणीमानात देखील होता आणि प्रेक्षकांना तो करारीपणा देखील आवडायचा. दादा कोणाकडे यांनी इच्छा माझी पुरी करा, खण खणपुरचा राजा अशी अनेक नाटकं गाजवली तर सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, असे अनेक चित्रपट आजही दादांसाठी ओळखले जातात.