शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिमानास्पद! महेश काळे यांच्या पत्नीची ‘ऑस्कर’पर्यंत झेप, पोस्ट शेअर करत म्हणाले “जिद्द, मेहनत अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 28, 2024 | 5:59 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Mahesh kale congratulate to his wife purva gujar because of she did her Phd in Music Technology see the details

अभिमानास्पद! महेश काळे यांच्या पत्नीची ‘ऑस्कर’पर्यंत झेप, पोस्ट शेअर करत म्हणाले “जिद्द, मेहनत अन्...”

भारतात शास्त्रीय संगीतातील एक मोठं व लोकप्रिय नाव म्हणजे गायक महेश काळे. आपल्या गायनाच्या अनोख्या बाजाने आजच्या तरुणाईला भारतीय शास्त्रीय संगीताकडे वळवण्याचे श्रेय महेश काळे यांना जाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महेश काळे यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. महेश काळे हे एक उत्तम गायक असण्याबरोबरच एक उत्तम परिक्षकदेखील आहेत. दरम्यान, महेश काळे हे संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव आहे हे आपण जाणतोच. पण त्यांची पत्नी पूर्वा गुजर-काळे यासुद्धा संगीत क्षेत्राशी संबंधित आहे.

पूर्वा गुजर-काळे यांनी नुकतीच संगीत क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पदवी संपादन केली असून यासंबंधित महेश काळेंनी सोशल मीडियावर एक पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत तिचे अभिनंदन केले आहे. महेश काळे यांनी आपल्या पत्नीचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “चेहऱ्यावर सौम्य स्मित असलेली एक सुंदर महिला जी खूप जिद्दी, मेहनती व हुशार आहे. गेल्या वर्षी डॉल्बी लॅबसाठी काम करत असताना तिने पाश्चात्य संगीत वादकांना भारतीय नोटेशन्सचे (स्वरलिपी) भाषांतर करण्याच्या महत्त्वपूर्ण संशोधनासह संगीत तंत्रज्ञानात पदवी पूर्ण केली आणि हे सर्व तिने आत्मविश्वासाने व समतोल साधत केले आहे”.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Kale (@maheshmkale)

आणखी वाचा – “मी लग्न केल्यापासून…”, नवऱ्याबरोबर घटस्फोट घेण्यावरुन नेहा कक्करचे पाहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “खूप वाईट वाटतं कारण…”

यापुढे महेश काळे यांनी असं म्हटलं आहे की, “डॉल्बी ॲटमॉस सिनेमा साउंड सिस्टमच्या निर्मितीसाठी तांत्रिक ऑस्कर २०२४मध्ये डॉल्बी मधील एक अभियांत्रिकी संघाला अकादमी पुरस्कार मिळाला. ज्या संघाचा पूर्वा एक भाग होती. त्यामुळे पूर्वाच्या या सर्व यशाबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी माझ्याबरोबर सामील व्हा”.  

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील श्याम राजपूत यांचे शिक्षण किती?, पाहिल्यांदाच सांगितले सत्य, म्हणाले, “माझ्या आईने…”

दरम्यान, महेश काळे यांनी शेअर केलेल्या पत्नीच्या फोटोवर अनेकांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, शरयू दाते या संगीत क्षेत्रातील कलाकारांसह मनोरंजन क्षेत्रातील सुकन्या मोने, पूर्वा गोखले, सानिया चौधरी यांनीही महेश काळे यांच्या पत्नीचे कौतुक केले आहे.  

Tags: Classical Singerentertainment newsMahesh KaleMahesh Kale Wife Marathi Singermarathi entertainment newsMarathi newsPoorva Gujarपूर्वा गुजरमनोरंजन बातमीमराठी गायकमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमहेश काळेमहेश काळे पत्नीशास्त्रीय गायक
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Sonalee Kulkarni commented that senior actors are not given priority in award functions

“पुरस्कार सोहळ्यांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्यांना मागे बसवतात अन्...”, सोनाली कुलकर्णीचा खुलासा म्हणाली, “मी उठून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.