रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी तुम्हाला ओळखतो आणि…”, सोनू निगम यांनी कौतुक करताच भारावून गेले समीर चौघुले, म्हणाले, “हा क्षण माझ्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
maharastrachi hasyajtra fame samir choughule shared photo with singer sonu nigam actor said it is fan moment for me

"मी तुम्हाला ओळखतो आणि…", सोनू निगम यांनी कौतुक करताच भारावून गेले समीर चौघुले, म्हणाले, "हा क्षण माझ्यासाठी…"

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून सर्वांना खळखळून हसवणारे लेखक व अभिनेते म्हणून समीर चौघुले यांना ओळखले जाते. त्यांच्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमाला आतापर्यंत अनेक दिवस झाले असूनही या शोची व या शोमधील कलाकारांची लोकप्रियता व प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. या शोची लहानापासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या मनात प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे आणि ही क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (Samir Choughule On Instagram)

समीर चौघुले यांनी केवळ विनोदीच नव्हे तर आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या शोचे चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांनी समीर चौगुले यांचे पाय धरतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

आणखी वाचा – सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला जान्हवी कपूर डेट करत असल्याचं खरं ठरलं, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “शिखूचे…”

यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम हेदेखील या शोचे चाहते असल्याचे समोर आले आहे. समीरने प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याबरोबरचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सोनू निगम यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत या फोटोवर समीरने “जेव्हा इतका मोठा प्रतिभावान व हरहुन्नरी कलाकार जेव्हा ‘मी तुम्हाला ओळखतो, मी तुम्हाला पाहिलं आहे’ असं म्हणतो. तेव्हा कलाकार म्हणून खरंच खूप भारी वाटतं” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते?’ मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा सोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा काही खास फोटो

सोनू निगम यांना भेटणे हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण असल्याची भावनादेखील त्याने यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान, समीर चौघुले यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून मनोरंजन करतात. त्यांचे स्किटस हे चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतात. दरम्यान, ‘चंद्रमुखी’, ‘बॉइज-३’ या चित्रपटांनंतर त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे अनेक चाहते आतुर असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.      

Tags: bollywood singerentertainment newsmarathi actrorsmarathi entertainmentMarathi newssamir chaughulesonu nigam
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
aamir khan daughter ira khan nupur shikhare wedding no- gift policy guest will donate to ngo instead

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आमिर खानच्या लेकीच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी असणार 'हा' खास नियम, महाराष्ट्रीयन पद्धतीनेच होणार विवाह अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.