बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून बाहेर पडले…”, विशाखा सुभेदारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाल्या, “विनोदी अभिनय…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 9, 2024 | 6:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi hasyajtra fame Vishakha Subhedar shared a post about doing comedy roles see the details

“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून बाहेर पडले...”, विशाखा सुभेदारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाल्या, “विनोदी अभिनय…”

विशाखा सुभेदार. मराठी विनोदी विश्वातील एक लोकप्रिय नाव. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या. विनोदाची अचूक जाण व टायमिंग साधत त्यांनी प्रत्येक विनोदी भूमिका अगदी अचूक वठवली. केवळ पोट धरुन हसवणारी विनोदी भूमिका नाही, तर राग व चीड येईल अशी खलनायिकाही त्या उत्तमरित्या निभावत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत त्या साकारत असलेल्या ‘रागिणी’.

आपल्या विनोदी, गंभीर व खलनायिकेच्या भूमिकांमधून चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. आजवर आपल्या भूमिकांनी चर्चेत राहणाऱ्या विशाखा त्यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत. विशाखा यांना ‘राम नगरकर पुरस्कार सोहळा २०२४’ मध्ये गौरविण्यात आलं. याचे काही फोटो शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली असून या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

विशाखा यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “राम नगरकर पुरस्कार सोहळा २०२४. हा पुरस्कार माझ्या गुरु स्थानी असलेल्या दोन सचिन मास्तर यांच्याकडून मिळाला हे ही माझं भाग्य. पण हा पुरस्कार देण्याचे ज्यांनी ठरवलं ते वंदन नगरकर हयात नाही याचे मात्र वाईट वाटले.”

आणखी वाचा – गुढीपाडव्याचा सण!, ‘या’ मराठी कलाकारांनी दणक्यात साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, पारंपरिक लूकमधील खास फोटो समोर

यापुढे त्यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “फु बाई फु ते हास्यजत्रा. विनोदी प्रहसन सादर करीत आले, त्याची शाबासकी मिळाली. पुरस्कार म्हटलं की, जबाबदारी आलीच. मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तुन बाहेर पडले याचा अर्थ असा नाही होत की, मी विनोदी अभिनय करण सोडलं. फक्त एक ब्रेक घेतला होता. मात्र पुन्हा एखाद्या विनोदी भूमिकेत दिसेनच.”

आणखी वाचा – “मोठी बहीण होणार” म्हणत मायरा वायकुळने दिली आईच्या प्रेग्नंन्सीची गुडन्यूज, कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

यापुढे त्यांनी रसिकांचे व नगरकरांचे आभारही मानले आहेत. तसेच त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर समीर चौघुले यांनी कमेंट करत विशाखा यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांचं अभिनंदनही केले आहे. त्याचबरोबर विशाखा यांच्या चाहत्यांनीदेखील कमेंट्सद्वारे त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Tags: maharashtrachi hasyajtraVisakha Subhedar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
divya agarwal first gudhi padwa

दिव्या अग्रवालने सासरी साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, नवऱ्याबरोबरचे खास फोटोही केले शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.