शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील श्याम राजपूत यांचे शिक्षण किती?, पाहिल्यांदाच सांगितले सत्य, म्हणाले, “माझ्या आईने…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 28, 2024 | 4:12 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi hasyajtra fame shyam Rajput talked about his struggle in film industry

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील श्याम राजपूत यांचे शिक्षण किती?, पाहिल्यांदाच सांगितले सत्य, म्हणाले, “माझ्या आईने...”

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या शोमुळे अनेक विनोदी कलाकार प्रसिद्धीझोतात आले, त्यापैकी एक म्हणजे अभिनेता श्यामसुंदर राजपूत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून “खानदेशचा सपूत श्यामसुंदर राजपूत अशी आपली एक वेगळी ओळख निर्माण करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र श्याम हे अभिनेते होण्याअगोदर इंजिनीअर होते. त्यामुळे इंजिनीअर क्षेत्र सोडून अचानक अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला.

‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात श्याम सुंदर राजपूत यांनी आपल्या या संघर्षाबद्दल सांगितले आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “इंजिनीअर झाल्यानंतर अचानक मनोरंजन क्षेत्रात येणे हा भयानक निर्णय होता. ज्या मुलाने याआधी कुठेही अभिनय केला नाही, कुठेही काम केले नाही किंवा जो मुलगा स्टेजवरही गेलेला नाही. त्यासाठी हा निर्णय खूपच धाडसी होता. एके रात्री मला माझ्या आईने रात्री २ वाजेपर्यंत समजावले, पण तिला कळलं हा काही ऐकणार नाही. त्यानंतर माझ्या आईने, भावाने आणि बायकोने मला खूपच पाठिंबा दिला. कधी काम आवडलं नाही तर त्यांनी मला तू यापेक्षा चांगलं काम करू शकला असता असा सल्ला दिला. पण त्यांनी मला हे काम करु नको असं कधीही सांगितलं नाही”.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानंतर अशोक सराफ यांचा ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मान, देवकी पंडीत व ऋतुजा बागवे यांचाही गौरव

यापुढे त्यांनी एक किस्सा सांगताना असं म्हटलं की, “काही काम केल्यानंतर मधल्या काळात माझ्याकडे काही काम नव्हतं. तेव्हा माझ्या खिशात फक्त १०० रुपये होते. तेव्हा मी मुंबईत एकटा होतो. माझ्याकडे पैसे होते, पण मी ते काही मित्रांना उधार दिले होते आणि मित्रांनी त्या त्या वेळेत ते पैसे परत न् दिल्याने माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते. मग एकेदिवशी मला ‘मस्त चाललंय आमचं’साठी फोन आला. तेव्हा मला त्यात काम केल्याचे दहा हजार व सहाय्यक म्हणून काम केल्याचे दहा हजार मिळाले होते. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला होता”.

आणखी वाचा – Video : धमाकेदार एन्ट्री घेत तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा भन्नाट डान्स, साध्या लूकमध्ये दिसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, श्याम सुंदर राजपूत यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या आधी अनेक विनोदी कार्यक्रमांमधून काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपट व कार्यक्रमांसाठी सहाय्यक म्हणून कामही केले आहे. त्यांच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक भूमिका गाजत असून प्रेक्षकांनाही या भूमिका विशेष आवडतात.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Saie Tamhankar instagram post

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटपासून दूर असण्याचे सई ताम्हणकरला दुःख, अजिबातच करमेना, म्हणाली, “मी बाहेर असल्यामुळे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.