बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटपासून दूर असण्याचे सई ताम्हणकरला दुःख, अजिबातच करमेना, म्हणाली, “मी बाहेर असल्यामुळे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 28, 2024 | 4:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saie Tamhankar instagram post

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटपासून दूर असण्याचे सई ताम्हणकरला दुःख, अजिबातच करमेना, म्हणाली, “मी बाहेर असल्यामुळे...”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. हा कार्यक्रम सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.विविध विनोदी भूमिका साकारत हास्यजत्रेतील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास कुठेही कमी पडत नाही आहेत. या कार्यक्रमाच्या परिक्षणाची जबाबदारी अभिनेता प्रसाद ओक व अभिनेत्री सई ताम्हणकर उत्तमरीत्या साकारत आहेत. अशातच सईच्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सईच्या या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Saie Tamhankar instagram post)

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मराठी चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’ व हिंदी चित्रपट ‘भक्षक’ यामुळे अधिक चर्चेत आली आहे. तिच्या मराठी व हिंदी चित्रपटातील भूमिकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या परिक्षकाच्या भूमिकेत ती पाहायला मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमामधून सई गायब असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे सई नेमकी कुठे गायब आहे याबद्दल साऱ्यांना जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, सईने स्वतः सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत याबाबतचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील श्याम राजपूत यांचे शिक्षण किती?, पाहिल्यांदाच सांगितले सत्य, म्हणाले, “माझ्या आईने…”

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “’महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील आवडती गोष्ट कोणती तर परिक्षकाच्या खुर्चीत बसलेली मी. माझ्या आगामी वेबसीरिजच्या चित्रीकणामुळे सध्या बाहेर आहे आणि त्यामुळे हास्यजत्रेला खूप मिस करत आहे”, अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे. दरम्यान, सईच्या खुर्ची प्रेमाबद्दल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची सूत्रसंचालक प्राजक्ता माळीने एकदा भाष्य केले होते. ती म्हणाली होती की, “सईमुळे मला खूप प्रेरणा मिळते. व्यावसायिक आयुष्य कसं जगावं हे तिच्याकडून शिकावं. ती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सेटवर वावरत असते. महत्त्वाचे म्हणजे ती कधीही तिची खुर्ची सोडत नाही. ज्याला कोणाला बोलायचे असेल तो तिच्या खुर्चीजवळ जाऊन बोलतो. ती खुर्चीतून थेट व्हॅनिटीमध्ये जाते आणि व्हॅनिटीमधून थेट खुर्चीमध्ये येऊन बसते”, असे प्राजक्ताने सांगितले होते.

आणखी वाचा – अनन्या पांडे होणार मावशी, बहिणीने व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज

सई अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहेत. आतापर्यंत तिने विविध चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. तिच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. नुकतेच नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘भक्षक’ चित्रपटामध्ये तिने साकारलेल्या पोलिस ऑफिसरच्या भूमिकेची सर्वांनीच खूप प्रशंसा केली आहे.

Tags: comedy showmaharashtrachi hasyajatramarathi actressmarathi showsai tamhankar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Next Post
Neha kakkar talked on her pregnancy and divorce rumours see the details

“मी लग्न केल्यापासून...”, नवऱ्याबरोबर घटस्फोट घेण्यावरुन नेहा कक्करचे पाहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “खूप वाईट वाटतं कारण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.