मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानंतर अशोक सराफ यांचा ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मान, देवकी पंडीत व ऋतुजा बागवे यांचाही गौरव

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 28, 2024 | 12:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ashok saraf rutuja bagwe and devki pandit announced sangeet natak akademi award see the details

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानंतर अशोक सराफ यांचा ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मान, देवकी पंडीत व ऋतुजा बागवे यांचाही गौरव

संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कलाक्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींना त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील अभिनेते अशोक सराफ, गायिका देवकी पंडीत व अभिनेत्री ऋतुजा बागवे आदी कलाकारांचाही समावेश आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नुकतंच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अशातच ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कारानंतर अशोक सराफ यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा मानाचा समजला जाणारा आणखी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गायिका देवकी पंडीत यांनाही संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे समोर आलं आहे. तसेच अभिनेत्री ऋतुजा बागवेलाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आणखी वाचा – Video : धमाकेदार एन्ट्री घेत तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा भन्नाट डान्स, साध्या लूकमध्ये दिसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

ऋतुजा बागवेला तिच्या नाट्यक्षेत्रातील अभिनयासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘उस्ताद बिस्मिल्लाह युवा खान पुरस्कार २०२२-२३’ हा पुरस्कार जाहीर झाला असून रंगभूमीवरील तिच्या ‘अनन्या’ या नाटकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण भारतात नाटक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांना हा पुरस्कार दिला जातो. तर नाट्यवर्तुळात या अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. ऋतुजाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या पुरस्काराची बातमी शेअर केली आहे.

आणखी वाचा – तापसी पन्नूची लगीनघाई! ‘या’ ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा, बॉलिवूड कलाकारांना निमंत्रण नसल्याचं आलं समोर

दरम्यान, हे पुरस्कार नवी दिल्लीच्या ‘नॅशनल अकॅडमी ऑफ म्युझिक’, डान्स व ड्रामा यांच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने असून एक लाख रुपये मानधन व ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

Tags: संगीत नताक अकादमी पुरस्कार बातमीसंगीत नाटक अकादमी पुरस्कारअशोक सराफऋतुजा बागबेमनोरंजन बातमीमराठी गायिकामराठी अभिनेतेमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजन बातमीदेवकी पंडीतashok sarafDevaki Panditentertainment newsmarathi actorsMarathi Actressesmarathi entertainment newsmarathi singerrutuja bagweSangeet Natak Academy AwardsSangeet Natak Academy Awards News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Aishwarya Narkar Mangalsutra

ऐश्वर्या नारकर यांच्या पारंपरिक मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष, आहे फारच युनिक, काळ्या मण्यांमध्ये कमी प्रमाणात सोन्याचा वापर अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.