सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हातात फोन, हटके पोझ अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांनी शेअर केला तरुणपणीचा फोटो, नेटकरी म्हणतात, “एकदम चिकना आणि…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 5, 2023 | 1:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arun Kadam share Old Photo

हातात फोन, हटके पोझ अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदम यांनी शेअर केला तरुणपणीचा फोटो, नेटकरी म्हणतात, "एकदम चिकना आणि…”

प्रत्येक व्यक्तीला जेव्हा त्याच्या घरातील एखादी जुनी गोष्ट सापडते, तेव्हा ती व्यक्ती त्याच्याशी निगडित अनेक जुन्या आठवणी जागवत असतात. भले ती, एखादी वस्तू असो किंवा एखादा फोटो. पण जर जुन्या काळात काढलेला एखादा फोटो कधीतरी अचानक सापडला की, त्याच्याशी निगडीत अनेक जुन्या आठवणीही ताज्या होतात. शिवाय, तो फोटो पाहून आपण आपल्या भूतकाळात हरवून जातो. मराठी कलाकारांच्या बाबतीस असे अनेक क्षण घडून गेले आहे. तसेच काहीसे घडले आहे, ते प्रेक्षकांचा लाडका दादूस अभिनेते अरुण कदम यांच्यासोबत. (Arun Kadam share Old Photo)

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवत आला आहे. याच कार्यक्रमामुळे यातील अनेक कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. असेच एक कलाकार जे प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत, ते म्हणजे अभिनेते अरुण कदम. अरुण यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीतून प्रेक्षकांसह परीक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यांच्या आग्री कोळी स्टाइलचे अनेकजण चाहते आहेत. प्रेक्षकांना मनमुराद हसवणारे अरुण कदम सोशल मीडियावरही सक्रिय असून ते आपले फोटोजच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहतात.

अरुण कदम यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक जुना फोटो त्यांच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एकदम वेगळेच दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हातात फोन दिसत असून या फोटोमध्ये त्या फोनचा उल्लेख करताना अरुण कदम म्हणतात, “हा फोन ज्या सालात आला होता, त्या सालातला हा फोटो आहे. शिवाजी मंदिरच्या समोर प्रकाश फोटोग्राफर होते, त्यांनी हा फोटो काढला होता”.

हे देखील वाचा – “केस परत आले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची पोस्ट, काही दिवसांपूर्वीच कापले होते केस पण…

View this post on Instagram

A post shared by Arun Kadam (@ladkadadus)

अरुण कदम यांचा जुन्या काळातील हा फोटो चाहत्यांना खूप आवडला असून तेदेखील या पोस्टवर गमतीशीर कमेंट्स करताना दिसत आहे. एका चाहत्याने त्यांच्या फोटोवर त्यांच्याच अंदाजात कमेंट करत म्हटलंय, “जाम भारी म्हणजे जाम भारी म्हणजे जामच भारी”. तर आणखीन एक चाहता म्हणतो, “कोणाला कॉल केला होता, जाम भारी”.

हे देखील वाचा – …म्हणून अतिशा नाईकने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका अर्धवट सोडली, म्हणाली, “आई खूप आजारी होती आणि…”

अभिनेते अरुण कदम सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात दिसत आहे. अरुण कदम नुकतेच आजोबा झाले असून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात नातवाचे स्वागत केले होते. त्यांच्या घरी चिमुकल्याच्या नामकरण सोहळ्याची जंगी तयारी सुरु आहे.

Tags: arun kadamArun Kadam share Old Photoinstagram postmaharashtrachi hasya jatra
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Snehal told her home memories

आई-बाबा जेवणाची ऑर्डर घेतात, चाळीत राहते अन्...; ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीने सांगितलेली ‘ती’ आठवण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.