‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते आहेत. हा कार्यक्रम जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून या कार्यक्रमाने स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. प्रेक्षकांचाही या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना आपल्या कलेच सादरीकरण करण्याची मोठी संधी मिळाली. अनेक नवोदित कलाकारांना या कार्यक्रमाने खूप मोठा असा प्लॅटफॉर्म दिला आहे. (maharashtrachi hasyajatra monsoon picnic)
हा मराठमोळा विनोदी कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नव्हे जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. परदेशातही ही कलाकार मंडळी नेहमीच दौरे करत प्रेक्षकांची मन जिंकत असतात. अभिनयाबरोबरच ही मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून ही मंडळी वेळात वेळ काढत एकमेकांसह एकत्र वेळ घालवतानाही दिसतात. अशातच सध्या ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीम पावसाळी सहल एन्जॉय करताना दिसत आहे.

वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पावसाळी सहल एन्जॉय करतानाचा खास फोटो शेअर केला आहे. “पावसाळी सहल इज मँडेटरी” असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वनितासह ओंकार राऊत, निखिल बने, रोहित माने व रसिका वेंगुर्लेकर यांची झलक पाहायला मिळत आहे. सगळे कलाकार मिळून पावसाठी ट्रिप एन्जॉय करताना दिसत आहेत.
वनिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये सगळ्या कलाकार मंडळींच्या हातात भाजलेलं मक्याचं कणीस पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळे कलाकार साधेपणाने आयुष्य जगतात. कायमच त्यांच्या साधेपणाचं कौतुक होताना पाहायला मिळतं. त्यामुळे या कलाकार मंडळींवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. नुकताच वनिता खरातचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी हास्यजत्रेतील सर्व कलाकार वनिताचा वाढदिवस साजरा करताना दिसले.