‘टाईमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता प्रथमेश परबने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक विनोदी व इतर भूमिकांनी प्रथमेशने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक चित्रपटांमधून प्रथमेश नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. तसेच तो त्याच्या पत्नीबरोबरचेही काही खास फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच प्रथमेशने प्रियसी क्षितिजा घोसाळकरबरोबर विवाहगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी चांगलीच चर्चेत आहे.
प्रथमेश व क्षितिजा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. दोघे जण आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. गेले काही दिवस दोघे जण त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत आहेत. त्यांच्या सोशल मीडियाद्वारे हे व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.
आणखी वाचा – Video: पूजा सावंतचा ‘कलरफूल’ अंदाज, परदेशात नवऱ्याबरोबर रोमॅंटिक डान्स, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
प्रथमेश-क्षितिजा यांनी त्यांच्या लग्नाला पाच महिने पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश सोफ्यावर बसून गालातल्या गालात हसतो. त्याला हसताना बघून क्षितिजा “अरे हा हसतोय का?” असा विचार करते. तसेच लग्नाला पाच महिने पूर्ण झाले आहेत. म्हणून माझा विचार करत हसत असेल” असं तिला वाटतं. यापुढे ती त्याच्या मनात काय चाललं असेल असा विचार करत त्याच्याजवळ जाऊन बसते. तेव्हा तिला प्रथमेश तौबा तौबा गाण्याबरोबर तिचा विचार करत असल्याचे वाटतं.
आणखी वाचा – “‘धर्मवीर-२’मध्ये एकनाथ शिंदेंचा हस्तक्षेप नाही”, क्षितीश दातेचं वक्तव्य, म्हणाला, “त्यांचे सल्ले…”
पण प्रत्यक्षात तसं काहीच नसतं.प्रथमेश मनातल्या मनात क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत असतो आणि हे ऐकून क्षितिजा त्याच्यावर रागावते. दोघांनी हा खास व्हिडीओ शेअर करत “पाच महिन्यांच्या आठवणी आणि प्रत्येक दिवस एकमेकांवर अधिक प्रेम करण्याच्या शुभेच्छा” असं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.