‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच हास्यजत्रेतील काही कलाकार काही दिवासांपूर्वी अलिबाग येथे फिरायला गेलेले पाहायला मिळाले. अलिबाग ट्रिपचे त्यांचे फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. वनिता खरातने या अलिबाग ट्रिपचा व्हिडीओ त्यांच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केला आहे. यामध्ये कलाकार मंडळी धमाल करताना दिसत आहेत. (Maharashtrachi Hasyajatra Team)
हास्यजत्रेतील कलाकार मंडळी सध्या त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधुन वेळात वेळ काढत अलिबाग येथे फिरायला गेली आहेत. वनिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वनितासह तिचा नवरा सुमित लोंढे, रोहित माने आणि त्याची बायको, रसिका वेंगुर्लेकर आणि तिचा पती सनी शिंदे, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत ही कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वनिता, प्रियदर्शिनी माशावर ताव मारताना दिसत आहेत. ही कलाकार मंडळी जिथे थांबले होते तिथे त्यांना माशांचं साग्रसंगीत जेवण केलं होतं. पापलेट फ्रायवर या संपूर्ण टीमने ताव मारलेला दिसला. शिवाय कोळंबी मसाला व तांदळाची भाकरीही जेवणात होती. शिवाय ही मेजवानी पूर्ण व्हावी म्हणून सोलकडीही बरोबर होतीच. जेवणानंतर काही वेळ आराम केल्यानंतर त्यांनी वृक्षारोपणही केले. याशिवाय त्यांनी अलिबाग येथे गेल्यानंतर नारळपाणी पीत गरमीपासून बचाव केला.
हास्यजत्रेतील मंडळी अलिबाग येथील चौल गावात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. हास्यजत्रेतील सगळीच कलाकार मंडळी नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. बरेचदा ही मंडळी त्यांच्या परदेशात दौऱ्यानिमित्त जातात तेव्हाही तिथे एकत्र फिरताना दिसतात. आता पुन्हा एकदा त्यांचा अलिबाग ट्रिपचा धमाल करतानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.