सध्या टेलिव्हिजनपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार, सोनी लीव्ह अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. समाजातील तसेच खासगी आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील सीरज आपल्या पाहायला मिळतात. तसेच या सिरिजला मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळते. दर महिन्याला विविध विषयांवरील अनेक वेबसीरिज पाहता येतात. मात्र आता ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने काय स्पेशल पाहता येईल हे जाणून घेऊया. (fathers day special)
जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. या वर्षी १६ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येकाचे आपल्या वडिलांबरोबर एक प्रेमाचे नाते असते. आईबरोबरच वडीलदेखील मुलांची सर्वतोपरी काळजी घेत असतात. आपल्या मुलांसाठी ते सर्वकाही करत असतात. त्यामुळे या फादर्स डेला तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर बसून कोणत्या सीरिज पाहू शकता हे जाणून घ्या.
हॉटस्टारवर असणारी ‘हॉस्टेजेस’ या सिरिजमध्ये कठीण परिस्थितीमध्ये वडील आपल्या मुलासाठी काहीही करु शकतात. हे दाखवण्यात आले आहे. या सीरिजमध्ये रोनित रॉय व टिस्का चोप्रा हे कलाकार आहेत. त्यानंतर ‘ये मेरी फॅमिली’ ही देखील एक कौटुंबिक वेबसीरिज आहे. ही सीरिज १९९० च्या काळातील मध्यम वर्गीय कुटुंबावर आधारित आहेत.
ॲमेझॉन मिनी टीव्हीवरील जमनापार ही सीरिज एका मध्यम वर्गीय कुटुंबाची आहे. यामधील वडील हे सर्व कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवतात. तसेच अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कौटुंबिक पार्श्वभूमी असून त्यातील वडील व त्यांची तरुण मुलं यांच्यामधील बॉंड दिसून येतो.
प्राइम ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘ब्रिथ’ या वेबसीरिजमध्येही वडील आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात याबद्दल दाखवले गेले आहे. ‘गुल्लक’ ही वेबसीरिजदेखील खूप लोकप्रिय झाली आहे. यामध्ये मध्यम वर्गीय पिता आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी काय काय करु शकतो हे दाखवण्यात आले आहे. या सीरिजचे आतापर्यंत तीन भाग आहेत.
या सर्व वेबसीरिज तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर पाहू शकता. तसेच त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असे तुम्ही करु शकता.