बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पापलेट, कोळंबी मसाला अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी मच्छीवरही मारला ताव, अलिबाग ट्रिपचा व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2024 | 3:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi Hasyajatra Team

पापलेट, कोळंबी मसाला अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांनी मच्छीवरही मारला ताव, अलिबाग ट्रिपचा व्हिडीओ व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच हास्यजत्रेतील काही कलाकार काही दिवासांपूर्वी अलिबाग येथे फिरायला गेलेले पाहायला मिळाले. अलिबाग ट्रिपचे त्यांचे फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. वनिता खरातने या अलिबाग ट्रिपचा व्हिडीओ त्यांच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केला आहे. यामध्ये कलाकार मंडळी धमाल करताना दिसत आहेत. (Maharashtrachi Hasyajatra Team)

हास्यजत्रेतील कलाकार मंडळी सध्या त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधुन वेळात वेळ काढत अलिबाग येथे फिरायला गेली आहेत. वनिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वनितासह तिचा नवरा सुमित लोंढे, रोहित माने आणि त्याची बायको, रसिका वेंगुर्लेकर आणि तिचा पती सनी शिंदे, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत ही कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – नवऱ्याने सामान फेकून देईन अशी धमकी दिल्यांनतर दलजित कौर स्पष्टच बोलली, म्हणाली, “माझा जन्म…”

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वनिता, प्रियदर्शिनी माशावर ताव मारताना दिसत आहेत. ही कलाकार मंडळी जिथे थांबले होते तिथे त्यांना माशांचं साग्रसंगीत जेवण केलं होतं. पापलेट फ्रायवर या संपूर्ण टीमने ताव मारलेला दिसला. शिवाय कोळंबी मसाला व तांदळाची भाकरीही जेवणात होती. शिवाय ही मेजवानी पूर्ण व्हावी म्हणून सोलकडीही बरोबर होतीच. जेवणानंतर काही वेळ आराम केल्यानंतर त्यांनी वृक्षारोपणही केले. याशिवाय त्यांनी अलिबाग येथे गेल्यानंतर नारळपाणी पीत गरमीपासून बचाव केला.

आणखी वाचा – कुणाकडे शरीरसुखाची मागणी तर कुणाला वाईट स्पर्श, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट अनुभव, धक्कादायक सत्य समोर

हास्यजत्रेतील मंडळी अलिबाग येथील चौल गावात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. हास्यजत्रेतील सगळीच कलाकार मंडळी नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. बरेचदा ही मंडळी त्यांच्या परदेशात दौऱ्यानिमित्त जातात तेव्हाही तिथे एकत्र फिरताना दिसतात. आता पुन्हा एकदा त्यांचा अलिबाग ट्रिपचा धमाल करतानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Tags: alibaug tripMaharashtrachi Hasyajatra Teammarathi actormarathi actressvanita kharat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
fathers day special

Father’s Day Special : बाप-मुलाचे नाते उलगडून सांगणाऱ्या ‘या’ सीरिजची ओटीटीवर चर्चा, तुम्ही पाहिल्यात का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.