बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वजन कमी करत आहे वनिता खरात, वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आता थांबून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 4, 2024 | 3:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vanita Kharat Workout

Video : वजन कमी करत आहे वनिता खरात, वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आता थांबून...”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना मनमुराद हसवत आहे. तुफान विनोदी स्किट्स व कलाकारांचा अफलातून अभिनय यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा जवळचा बनला आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांची एक फॅन फॉलोविंग निर्माण झाली आहे. याच कार्यक्रमातून ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणजे अभिनेत्री वनिता खरात ही प्रेक्षकांच्या आवडता चेहरा बनली. आज तिचा स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. (Vanita Kharat Workout)

वनिताने केवळ मालिकेपुरतं मर्यादित न राहता आपला मोर्चा चित्रपटाकडे वळवला. यामध्ये तिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘वाळवी’, ‘सरला एक कोटी’, ‘एकदा येऊन तर बघा’ हे मराठी चित्रपट तसेच ‘कबीर सिंग’ या हिंदी चित्रपटातून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली. गेली अनेक वर्ष विनोदी पात्रांमधून प्रेक्षकांना आपलंसं करणारी वनिता सोशल मिडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते, नेहमीच ती काही ना काही शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

आणखी वाचा – लग्नाच्या दोन महिन्यांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री गरोदर, बेबी बम्प दाखवत फोटो केला शेअर, म्हणाली, “आता आम्ही…”

अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वनिता फिटनेसचे धडे घेताना दिसत आहे. नेहमीच वनिता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फिटनेसचे, जिमचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. यावरून सध्या वनिता तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन जिम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “थांबून चालणारच नाही आता” असं म्हणत वनिताने व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – “ते दिवस नरकासारखे…”, सोनम कपूरच्या नवऱ्याला झाला होता गंभीर आजार, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “तीन महिने माझ्यासाठी…”

वनिता खरातने शेअर केलेल्या जिमच्या कॅप्शनवरुन व व्हिडीओवरुन तिने नित्यनियमाने व्यायामाचा ध्यास घेतलेला पाहायला मिळत आहे. कलाकार मंडळी म्हटलं की त्यांना विशेषतः त्यांच्या फिटनेसकडे लक्ष हे द्यावंच लागतं. वनिताही तिच्या फिटनेसकडे लक्ष देत असून व्यायामाचे धडे घेताना दिसत आहे.

Tags: entertainmentmaharashtarcahi hasyajtramhjvanita kharatvanita kharat workout
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Bigg Boss 17

Bigg Boss 17 : "तू निघ इथून…", विकी जैन व अंकिता लोखंडेमधील वाद विकोपाला, एकमेकांची इज्जतही काढली, म्हणाला, "तुझी इज्जत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.