प्रसिद्ध दक्षिण अभिनेत्री अमाला पॉलने नुकतेच प्रियकर जगत देसाईबरोबर लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आमलाने ती गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीबद्दलची माहिती दिली आहे. अमलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पती जगतबरोबरचे काही हटके फोटो पोस्ट करून तिच्या गरोदरपणाबद्दल सांगितले आहे. (Amala Paul On Instagram)
या फोटोमध्ये आमलाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर जगतने काळ्या रंगाचा शर्ट व त्यावर पॅंट परिधान केली आहे. दोघांनी बीचवर खास पोज देत एकमेकांबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये अमला तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “आता मला माहित आहे की १+१ हे तुझ्याबरोबर ३ आहे.” या फोटोखाली अनेक कलाकार मंडळींनी व चाहत्यांनी कमेंट करत अमाला व जगतला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
अमला-जगतचे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी कोचीमध्ये लग्न पार पडले होते. तिच्या लग्नात अमालाने लॅव्हेंडर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर जगतनेही अमालाच्या लूकला साजेसा अशी शेरवानी परिधान होती. अमालाचे हे दुसरे लग्न असून तिचा पहिला संसार अवघ्या तीन वर्षातच मोडला होता. अमालाने दिग्दर्शक एल. एल. विजयबरोबर पहिलं लग्न केलं होतं. २०१७ मध्ये अमालाने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर तिची मैत्री जगतबरोबर झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अमालाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने प्रामुख्याने हिंदी, तमिळ व मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मामूटीचा ख्रिस्तोफर हा तिचा नुकताच प्रदर्शित झाला होता. अमालाने अजय देवगणच्या ‘भोला’मध्येही छोटीशी भूमिका साकारली होती. दरम्यान, अमालाने शेअर केलेल्या या फोटोखाली अनेक् कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनीही तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिला अभिनंदनही केले आहे.