Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा शो सुरु झाल्यापासून सर्वत्र या शोची चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांमध्ये सुरु असलेली चुरशीची लढत पाहणं रंजक ठरतंय. ‘बिग बॉस’मध्ये कपल स्पर्धकांनी एंट्री घेतलेली पाहायला मिळाली होती. तेव्हापासून अंकिता लोखंडे व विकी जैन हे कपल चर्चेत आलं. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून या कपलमध्ये वाद सुरु असलेला पाहायला मिळाला. दिवसेंदिवस हा वाद विकोपाला जाताना पाहायला मिळाला.
‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अंकिता व विकी यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री नवऱ्याबरोबरच्या वादामुळे चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’चा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये येत्या भागात अंकिता लोखंडे कॅप्टन पदाची मानकरी ठरली आहे. कॅप्टन झाल्यामुळे अंकिता घरातील सर्व स्पर्धकांशी समान वागताना दिसत आहे. यावेळी ती तिच्या नवऱ्यालाही समान वागणूक देताना दिसत आहे.
नव्या प्रोमोमध्ये अंकिता व विकी यांच्यात वाद सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अंकिता विकीला असं बोलताना दिसत आहे की, “कॅप्टनची इज्जत कर” यावर विकी अंकिताला बोलतो की, “कॅप्टनची इज्जत कॅप्टनच्या वागणूकीवर होणार, चल जा” असं बोलतो. यावर अंकिताही रागात “तू जा इकडून निघून” असं बोलताना दिसते. यावेळी विकी व अंकिता एकमेकांना ‘बेशिस्त’, ‘गाढव’ असं बोलताना दिसतात. यावर रागात अंकिता विकीला, “हेच आहे तुझं खरेपण, तू माझ्यावर जळतोस” असं बोलताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी अंकिता भांडणाच्यामध्ये बोलल्याचं विकीला सहन झालं नाही. दरम्यान त्याने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. तर बरेच दिवस आधी अंकिताने विकीवर चप्पलही फेकून मारली होती.