सध्या दिवाळी सणानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतंय. सर्वसामान्यांपासून ते अगदी राजकीय नेते, तसेच कलाकार मंडळीही धुमधडाक्यात दिवाळी साजरी करताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकार मंडळींनी दिवाळी सणानिमित्त अनेक फोटोस, व्हिडीओस चाहत्यांसह शेअर केले आहेत. अशातच बऱ्याच कलाकार मंडळींची ही यंदाची पहिली दिवाळी आहे. पहिल्या दिवाळी सणाचा आनंद शेअर करत अशाच एका मराठमोळ्या कलाकार जोडीने दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटोस शेअर केले आहेत. (Vanita Kharat On Her First Diwali)
ही लाडकी कलाकार जोडी म्हणजे अभिनेत्री वनिता खरात आणि सुमित लोंढे. वनिता व सुमित हे त्यांच्या लग्नानंतरचा प्रत्येक सण आवडीने साजरा करताना पाहायला मिळतात. अशातच लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करतानाचे फोटोस वनिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. वनिता व सुमित यांच्या लग्नानंतर ते त्यांच्या लग्नानंतरचा प्रत्येक सण खास पद्धतीने साजरा करतात. यंदाची दिवाळी ही वनिता व सुमितसाठी अर्थात खास होती.
वनिताने त्यांच्या पहिल्या दिवाळी सणानिमित्त कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटोस पोस्ट केले आहेत . यांत वनिता व सुमितने सारख्याच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांचा पारंपरिक लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दिव्यांची आरास हातात घेऊन वनिताने काढलेल्या फोटोत तीच सौंदर्य अगदी खुलून आलं आहे. वनिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या सासरची मंडळी पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत “पहिली दिवाळी, दिवाळीच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा” असं कॅप्शन देत तिने तिच्या चाहत्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
वनिता व सुमितच्या या पहिल्या दिवाळी सणानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनेकांनी कमेंट करत त्यांच्या लूकच कौतुक केलं आहे. तसेच अनेकांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत म्हंटल आहे की, “लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय”. तर अनेकांनी या फोटोसवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.