बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सराफांच्या घरचा फराळ”, निवेदिता सराफांनी स्वतःच्या हाताने बनवला खमंग फराळ, आस्वाद घेत अशोक मामा म्हणाले, “खूप…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 13, 2023 | 10:21 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nivedita Saraf And Ashok Saraf Diwali Video

"सराफांच्या घरचा फराळ", निवेदिता सराफांनी स्वतःच्या हाताने बनवला खमंग फराळ, आस्वाद घेत अशोक मामा म्हणाले, "खूप…"

आनंद, सुख, शांती यांची आरास सजवणारा सण म्हणजे दिवाळी. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. ठिकठिकाणी रंगेबेरंगी आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्या, फटाक्यांची आतिषबाजी आणि खमंग असा फराळ या सर्व गोष्टींनी शहर गजबजलेलं दिसतंय. अशातच प्रेक्षकांची लाडकी कलाकार मंडळी देखील या सणाचा आनंद घेताना दिसत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील लाडकी जोडी म्हणजेच अशोक सराफ व निवेदिता सराफ यांनी सुद्दा दिवाळीच्या फराळाचं आमंत्रण देत दिवाळीच्या शुभेच्छा देत एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. (Nivedita Saraf And Ashok Saraf Diwali Video)

दिवाळीनिमित्त अशोक सराफ व निवेदिता सराफ यांनी एक फराळ करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अशोक सराफ व निवेदिता सराफ हे अगदी पारंपरिक लूकमध्ये फराळाचं ताट घेऊन बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये निवेदिता यांनी स्वतःच्या हाताने फराळ बनवलेला पाहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर अशोक सराफ हे निवेदिता यांनी बनवलेला फराळ खात त्यांचं कौतुक करताना ही दिसत आहेत.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या घरी यंदा दिवाळी उत्साहात, नातवाला उटणं लावताचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ शेअर करत, निवेदिता म्हणताना दिसत आहेत की, “सराफांच्या घरचा फराळ तयार आहे. मस्त छान पातळ पोह्यांचा चिवडा, चकली, शेव आणि खाजाचे कानवले याचे रंग बघा किती मस्त आहेत. तसेच गुळपापडीचे लाडू. असं म्हणून त्या अशोक सराफ यांना विचारतात, ‘तर तू काय खाणार आहेस?’, यावर उत्तर देत, अशोक मामा गमतीत म्हणतात, ‘मी सगळंच खाणार आहे’. त्यावर त्या चकली खाऊन बघ, असं म्हणत चकली अशोक मामांच्या हातात देतात. यावर अशोक सराफ, ‘खूप छान चकली केली आहेस’ असं म्हणत निवेदिता यांची स्तुती करतात. त्यानंतर त्या खाजाचे कानवले त्यांना खायला देतात, तो खाऊनही ‘छान आहे’ असं म्हणत ते निवेदिता यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची स्तुती करतात. या व्हिडिओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसतोय. त्यांनतर त्यांनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्याने घेतलं स्वतःचं हक्काचं घर, बायकोने शेअर केला खास फोटो; म्हणाली, “आम्हाला जसा वेळ…”

या व्हिडिओ मध्ये निवेदिता त्यांनी बनवलेल्या फराळाची नाव सांगत अशोक सराफ त्या फराळाचा चांगलाच आस्वाद घेताना दिसत आहेत. निवेदिता सराफ- अशोक सराफ यांच्या सह अन्य कलाकारांनी देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत विविध व्हिडीओ शेअर केले आहेत.

Tags: ashok sarafentertainmentmarathi actormarathi actressmarathi serialnivedita sarafNivedita Saraf And Ashok Saraf Diwali Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Shinde Family started new Business

"बाबासाहेब तुम्ही म्हणालात…", शिंदे कुटुंबियांनी पंढरपुरात सुरु केला नाव व्यवसाय, म्हणाले, "आता विषय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.