शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ज्या समाजात महिलांचा…”, प्राजक्ता माळीबद्दल सचिन गोस्वामींची प्रतिक्रिया, म्हणाले, “जे घडत आहे ते…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 29, 2024 | 9:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Sachin Goswami supported Prajakta Mali with sharing special post

प्राजक्ता माळीला मराठी कलाकारांचा पठिंबा, सचिन गोस्वामींनी शेअर केली खास पोस्ट

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी तिच्या नावाचा केलेला चुकीचा वापर. आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. प्राजक्ताचं नाव घेतल्यामुळे हे प्रकरण खूप चिघळलं असून या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. तिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत याबाबत तिचं मत मांडलं आणि सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करत संताप व्यक्त केला.  (Sachin Goswami supported Prajakta Mali)

बीडमध्ये बोलताना सुरेश धस यांनी, “मला जर इव्हेंट मॅनेजमेंट दिले, तर मी नाचायला प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांना बोलवेन” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या सर्व प्रकरणी एकच गदारोळ झाला. या प्रकरणी प्राजक्ताने काल (शनिवार २८ डिसेंबर) रोजी पत्रकार परिषद घेत तिची भूमिका स्पष्ट केली. यानंतर प्राजक्ताच्या समर्थनार्थ अनेक मराठी कलाकार समोर आले आहेत. 

आणखी वाचा – “परळीत कधी पुरुष कलाकार गेलेच नाहीत का?”, धनंजय मुंडे प्रकरणावर अखेर बोलली प्राजक्ता माळी, सुरेश धस यांना सवाल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक, लेखक सचिन गोस्वामी यांनीदेखील या प्रकरणी खास पोस्ट शेअर करत प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजता जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडत आहे ते निषेधार्ह आहे. क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरुया”.

आणखी वाचा – “तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची”, करुण मुंडेंच्या आरोपांवर प्राजक्ता माळीचं भाष्य, म्हणाली, “चिखलफेक करुन…”

दरम्यान, प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत असं म्हटलं की, “गेल्या दिड महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरु आहे. गेले दिड महिने अत्यंत शांतपणे मी या सगळ्याला सामोरी गेली आहे. माझी शांतता म्हणजे माझी मुकसंमती नाही. मी, माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. एक व्यक्ती कुठल्या तरी रागाच्या भरात बरळून जाते आणि त्यानंतर हजारो व्हिडीओ बनतात. एकमेकांना उत्तर देण्यामध्ये चिखलफेक होत राहते. महिलांची अब्रु निघते”.

Tags: prajakta mali press conferenceprajkta mali newsSachin Goswami supported Prajakta Mali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar wedding card first photo viral and Kunal Bhagat started crying after seeing card

अंकिता वालावलकरची लगीनघाई! लग्नपत्रिकेचा पहिला फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्याला अश्रु अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.