सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे अंकिता वालावलकर. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली अंकिता प्रभू वालावलकर कायमच चर्चेत राहिली आहे. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अंकिताने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या हाताचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमुळे अंकिताचा बॉयफ्रेंड कोण असेल याबद्दल उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच तिने बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केला. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून अंकिताच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (Ankita Walawalkar wedding card)
अशातच आता कोकण हार्टेड गर्लची लग्नपत्रिका समोर आली आहे. अंकिता ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नपत्रिकेची खास झलक शेअर केली आहे. अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये केळीच्या पानांवर तिचे व कुणालचे नाव लिहिले असल्याचे पाहायला मिळत आहे. कुलदेवत व आजोळच्या देवाला तिने लग्नाची ही पहिली पत्रिका अर्पण केली आहे.
आणखी वाचा – “ज्या समाजात महिलांचा…”, प्राजक्ता माळीबद्दल सचिन गोस्वामींची प्रतिक्रिया, म्हणाले, “जे घडत आहे ते…”
अंकिता व कुणाल यांच्या लग्नाची ही पत्रिका पाहून कुणालला अश्रु अनावर झाल्याचेही पाहायला मिळत आहे. अंकिताने कुणालची एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात लग्नपत्रिका बघताच तो भावुक होतो आणि त्याला अश्रु यांवर होतात. यावर अंकिता त्याची मस्करी करत “आताच का रडत आहेस. नंतर लग्नात रड, तेव्हा खूप सारे फोटोग्राफर्स असतील, आता नको रडूस मला तुला तेव्हा रडताना बघायचं आहे”. अंकिताची ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – I Love You म्हणत आदित्यने पारूला केलं प्रपोज, मात्र हे सत्य की असत्य? नवीन प्रोमोमुळे उत्सुकता शिगेला
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर आल्यापासून अंकिताच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना ती लग्नबंधनात कधी अडकणार यांची उत्सुकता लागून् राहिली आहे. अशातच आता त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते मंडळी तिच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.